By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
RRR च्या यशाने Junior NTR झाला भावूक; स्टारकास्ट, क्रू मेंबर्स आणि चाहत्यांचे मानले आभार
Jr NTR On RRR Massive Success: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण स्टारर चित्रपट 'आरआरआर' चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर (RRR’ box office) धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या यशाने केवळ निर्मातेच नाही तर स्टारकास्टही खूप खूश आहेत.

Jr NTR On RRR Massive Success: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण स्टारर चित्रपट ‘आरआरआर’ चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर (RRR’ box office) धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या यशाने केवळ निर्मातेच नाही तर स्टारकास्टही खूप खूश आहेत. ‘RRR’मधील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणारा ज्युनियर एनटीआर या यशाने (RRR Massive Success) भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकार, क्रू मेंबर्स आणि चाहत्यांसाठी खास पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘आरआरआर’ बॉक्स ऑफिसवर (RRR’ box office) ब्लॉकबस्टर ठरला आहे. ज्युनियर एनटीआर या चित्रपटाच्या प्रचंड यशाने खूप आनंदी झाला आहे. चित्रपटात कोमाराम भीमची भूमिका साकारलेल्या ज्युनियर एनटीआरने एक धन्यवाद नोट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले की, ‘तुम्ही सर्वांनी ‘RRR’ ची प्रशंसा केली आहे आणि चित्रपट रिलीज झाल्यापासून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ज्यांनी ‘RRR’ यशस्वी केला त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो, माझ्या कारकिर्दीतील हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे.”
I’m touched beyond words… pic.twitter.com/PIpmJCxTly
— Jr NTR (@tarak9999) March 29, 2022
Trending Now
या पत्रात त्याने दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचे देखील आभार मानले आहेत. एनटीआरने लिहिले “जक्कण्णा, मला माझे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खरोखरच माझ्यातून सर्वोत्तम बाहेर आणलेत. मी कोणत्याही व्यक्तिरेखेशी जुळवून घेऊ शकतो याची जाणीव तुम्ही मला करून दिली. तुम्ही मला एका अभिनेत्याच्या रुपात सादर केले आहे”.
अभिनेता ज्युनियर एनटीआरने सुपरस्टार राम चरणचे (Ram Charan) देखील कौतुक करत मनापासून स्तुती केली आहे. एनटीआर म्हणाला “राम चरणशिवाय त्यांची भूमिका अपूर्ण राहिली असती. आपल्या पत्रात तो म्हणाला ‘चरण, माझ्या भावा, मी तुझ्याशिवाय आरआरआरमध्ये अभिनय करण्याची कल्पना करू शकत नाही. ‘अल्लुरी सीताराम राजू’च्या भूमिकेला इतर कोणी न्याय देऊ शकले नसते. फक्त आरआरआरच नाही तर भीम देखील तुझ्याशिवाय अपूर्ण राहिला असता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या