Top Recommended Stories

Salman Khan Photo With Mother: सलमान खानचा आईसोबतचा हा सुंदर फोटो होतोय व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाला..

Salman Khan Photo With Mother: सलमान खान या फोटोमध्ये त्याची लाडकी आई सलमा खानसोबत आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.

Published: February 9, 2022 4:16 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Salman Khan
Salman Khan

Salman Khan Photo With Mother: बॉलिवूडचा (Bollywood) ‘दबंग’ अर्थात सलमान खान (Actor Salman Khan) अनेकदा नवनवीन कारणांमुळे चर्चेत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि आपल्या दमदार शैलीने सर्वांच्या मनावर राज्य करणारा सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर (Social Media) सलमान खानचा फोटो (Salman Khan Photo) धुमाकूळ घातल्याशिवाय राहत नाही. सलमान खानचा एक नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. सलमान खान या फोटोमध्ये त्याची लाडकी आई (Salman Khan Mother) सलमा खानसोबत (Salma Khan)आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.

Also Read:

You may like to read

सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Salman Khan Instagram) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो नेटिझन्सला खूप आवडला आहे. फोटोमध्ये सलमान खान त्याची आई सलमा खानच्या मांडीवर झोपलेला दिसत आहे. संपूर्ण सोशल मीडियावर या सुंदर फोटोवर सलमानचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे. फोटोमध्ये सलमान खानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे तर त्याची आई सलमा यांनी निळ्या-पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केल्याचे दिसत आहे.

आई-मुलाचा हा निरागस फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘आईची कुशी…स्वर्ग’. ‘भाईजान’ची ही स्टाईल पाहून चाहतेही भावूक झाले आहेत आणि या फोटोला भरभरून प्रेम देत आहेत. सलमान खानचे त्याच्या आईवर आणि कुटुंबावर खूप प्रेम आहे. सोशल मीडियावर तो नेहमी कुटुंबासोबतचे फोटो पोस्ट करत असतो. सलमान हा लेखक-अभिनेता सलीम खान आणि सलमा खान यांचा मुलगा आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सलमान खान लवकरच कतरिना कैफसोबत (Katrina Kaife)’टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. सलमानचे आणखी बरेच प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर तो हळूहळू काम सुरू करत आहे. सलमानच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये जॅकलिन फर्नांडिससोबत ‘किक 2’ आणि पूजा हेगडेसोबत ‘कभी ईद कभी दिवाळी’ यांचा समावेश आहे. भाईजानच्या प्रत्येक चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. महत्वाचे म्हणजे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुद्धा करतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या