Sath Nibhana Sathiya: 'रसोडे में कौन था?' फेम राशी पुन्हा चर्चेत; जाणून घ्या ती सध्या काय करतेय...
'साथ निभाना साथिया' ( Sath nibhana sathiya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी देखील त्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे 'रसोडे में कौन था?' (Rasode main kon tha fame) फेम राशी पुन्हा चर्चेत आली आहे.

‘साथ निभाना साथिया’ ( Sath nibhana sathiya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी देखील त्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ‘रसोडे में कौन था?’ (Rasode main kon tha fame) फेम राशी पुन्हा चर्चेत आली आहे. तिने पुन्हा आपल्या फॅन्सचे लक्ष वेधले आहे. गोपी बहूला रसोडे में कौन था ? असा सवाल करताना तिची सासू कोकिलाबेन मोदी विचारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसे बघितले तर मालिकेमध्ये वारंवार बोलला जाणारा हा संवाद सामान्य आहे. परंतु, मालिकेत सासूचे पात्र असलेली कोकिलाबेन मोदी तिच्या दोन्ही (गोपी आणि राशी) सुनांवर ज्याप्रमाणे रुबाब झाडते, ते पाहाण्यासारखे आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांचे लक्ष या संवादानेच वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Also Read:
सोशल मीडियावर मीम्सचा पूर…
या व्हिडिओत किचनमध्ये रिकामा कुकर ठेवल्याबद्दल राशीवर कोकिलाबेन ओरडते. मात्र, या संवादाला रॅपच्या गाण्याचे रूप देण्यात आल्याने व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे या व्हिडीओमुळे अनेकांना वेड लागले आहे. ‘रसोडे मैं कोण था? या प्रश्नावर सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. सर्व सेलेब्रिटी आपापल्या परीने प्रतिक्रिया देत आहेत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचनमध्ये रिकामा कुकार ठेवणाऱ्या रुचा हसबनीस (rucha hasabnis) हिची प्रतिक्रिया आहे. तिने हा व्हिडीओ इंस्टाग्रावर शेअर करताना ‘वो मैं थी’ असे लिहिले आहे.
रुचाच्या पोस्टवर अदा खानाची ( Aada khan) देखील प्रतिक्रिया आली आहे. यात ती म्हणते आहे की ‘राशी बेबी यू ट्रेंडिंग वाह.. ‘. या व्हायरल व्हिडीओमुळे रुचा हसबनीस पुन्हा चर्चेत आली आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या व्हायरल व्हिडीओमुळे सर्व कलाकार पुन्हा चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
ती सध्या काय करतेय?
‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील राशी अर्थात रुचा हसबनीस ही कुठे गेली? ती सध्या काय करते, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. राशी सध्या तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. रुचा हसबनीस ही एका मुलीची आई आहे. ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. राशी तिच्या कुटुंबासह मुंबईतच राहत आहे. ती लाईमलाईटपासून लांब असल्याचे बोलले जात आहे.