मुंबई: बॉलिवूडच्या दिग्‍गज एक्‍ट्रेस शबाना आझमी (Bollywood Actress Shabana Azmi) यांना घरबसल्या दारू मागवणं चांगलंच महागात पडलं आहे. शबाना आझमी यांची ऑनलाईन व्यवहारात (Online Fraud) आर्थिक फसवणूक झाली आहे. याबाबत खुद्द शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.Also Read - Rape in Mumbai: धक्कादायक! 35 वर्षीय लेखिकेवर मुंबईत बलात्कार, नराधमाने दाऊदच्या नावाने धमकावले

शबाना आझमी यांनी एका वॉईनशॉपमध्ये दारुसाठी ऑर्डर दिली होती. त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करून दारु घरपोहोच (Liquor Home Delivery) मागवली होती. यासाठी त्यांनी एडव्हॉन्स पेमेंट देखील केलं होतं. परंतु, बराच वेळ झाला तरी त्यांना पार्सल मिळालंच नाही. त्यांनी संबंधित वाईनशॉपवर फोन केला. मात्र, त्यांचा फोन कोणी रिसिव्ह केलाच नाही. त्यानंतर शबाना यांनी ट्वीट करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. Also Read - Mumbai News : जुहू बीचवर बुडालेल्या तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश!

Also Read - Sakinaka Rape Case: मोठी बातमी! साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा

‘सावधान, माझी Living liquidz कडून फसवणूक झाली आहे. मी या दुकानातून घरपोहोच मद्य मागवली होती. त्यासाठी एडव्हॉन्स पेमेंट देखील केलं होतं. मात्र, मला पार्सल मिळालं नाही. मी संबंधित दुकानात फोन करतेय पण कोणी फोन घेत नाही आहे, असं शबाना आझमी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Living Liquids न दिला रिप्लाय…

शबाना आझमी यांचं ट्वीट पाहून Living Liquidz नं तातडीनं रिप्लाय दिला आहे. मॅडम, गुगलवर घरपोहोच मद्य मागवण्यासाठी दिलेले नंबर 99 टक्के बनावट आहे. आपली Living Liquidz कडून कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही. सामान्य ठगबाजांकडून आपली फसवणूक झाली आहे. कृपया पोलिसांत तक्रार करा. या प्रकरणी नागरिकांमध्ये जनजागृती करा, असा सल्ला Living Liquidz कडून शबाना आझमी यांना देण्यात आला आहे.