Top Recommended Stories

100 चित्रपटात रिटेक्ट झाला होता Shahid Kapoor, स्टारकिड असतानाही करावा लागला संघर्ष!

Shahid Kapoor Birthday : अभिनेता शाहिद कपूर आज आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आपण त्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत....

Published: February 25, 2022 5:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

shahid kapoor
shahid kapoor

Shahid Kapoor Birthday : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Actor Shahid Kapoor) चित्रपटांमधील त्याच्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखला जातो. तो बॉलीवूडच्या त्या स्टार किड्सपैकी (Starkids) एक आहे ज्यांना फिल्म इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्षांचा आणि चढ-उतारांचा सामना करावा लागला. शाहिद कपूरचा जन्म (Shahir Kapoor Birthday) 25 फेब्रुवारी 1981 रोजी दिल्लीत अभिनेता पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि अभिनेत्री नीलम आझमी (Neelam Azami) यांच्या घरी झाला. परंतु शाहिद 3 वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. अभिनेता शाहिद कपूर आज आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आज आपण त्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी (Shahid Kapoor Birthday Special) जाणून घेणार आहोत….

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केले काम –

घटस्फोटानंतर शाहिदचे वडील पंकज कपूर मुंबईला गेले आणि शाहिद त्याच्या आईसोबत दिल्लीत राहत होता. त्याचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतून पूर्ण झाले. लहानपणापासूनच त्याला डान्सची आवड होती. शाळेच्या कार्यक्रमात तो भाग घेत असे. शाहिद कपूरने बॅकग्राउंड डान्सर म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. ‘दिल तो पागल है’ आणि ‘ताल’ या चित्रपटांमध्ये तो बॅकग्राउंड डान्सर होता. यानंतर शाहिद कपूर अनेक जाहिरातींमध्येही दिसला.

You may like to read

पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट –

प्रदीर्घ संघर्षानंतर 2003 मध्ये ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून त्याला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर शाहिद कपूर ‘फिदा’, ‘दिल मांगे मोर’, ‘दिवाने हुए पागल’, ‘वाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. ‘लाइफ हो तो ऐसा’ आणि ‘शिखर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्याने काम केले. त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. यानंतर 2006 मध्ये ‘विवाह’ चित्रपटात त्याने काम केले. त्याचा हा चित्रपट खूप हिट ठरला. त्याचबरोबर 2007 मध्ये आलेला इम्तियाज अलीचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट देखील खूप हिट ठरला. शाहीदचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली.

100 चित्रपटातून केले रिजेक्ट –

2016ला एका मुलाखतीदरम्यान शाहिद कपूरने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘फिल्मी बॅकग्राऊंडमधऊन येऊन सुद्धा माझ्या संघर्षाची कहाणी एखाद्या आऊट साइडरपेक्षा कमी नाही. अनेकवेळा असे घडायचे की माझ्याकडे खायला पैसे नव्हते आणि ऑडिशनला जाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. मी ते आयुष्य जगलो आहे ज्याच्याबद्दल मला बोलायचे नाही पण तेच माझे सत्य आहे.’ आज बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शाहिदला एके काळी जवळपास 100 चित्रपटात रिजेक्टचा सामना करावा लागला. खूप मेहनतीनंतर त्याला पहिल्यांदा ‘इश्क-विश्क’ चित्रपटात संधी मिळाली. त्याचा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि शाहिद कपूर खूपे पुढे गेला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.