मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत (India’s independence movement ) आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील (Sayukta Maharashtra Ladha) शिलेदार, स्वातंत्र्यसेनानी कृष्णराव साबळे (Krushnarao Sabale) उर्फ शाहीर साबळे (Shahir Sabale) यांची जन्मशताब्दी वर्ष 3 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाले आहे. आपल्याला शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची (Maharashtra Shahir Movie) घोषणा करण्यात आली आहे.Also Read - Santosh Juvekar FB Post: मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक, फेसबुक पोस्ट करत म्हणाला...

शाहीर साबळे यांचा नातू आणि प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) हे हा चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहीर साबळे यांचा जीवन प्रवास पाहता येणार आहे. प्रतिमा कुलकर्णी (Pratima Kulkarni) या चित्रपटाचे लेखन करणार आहेत. याचित्रपटाबद्दल बोलताना केदार शिंदे यांनी सांगितले की, ‘एक कलाकार म्हणून मला कलावंत आजोबांचे जीवन खूप मोठे वाटते. हा चित्रपट नव्या पिढीला मार्गदर्शन करेल.’ Also Read - Mahesh Manjarkar: महेश मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान, रिलायन्स रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

साताऱ्याजवळील पसरणी येथे कृष्णराव साबळे यांचा 3 सप्टेंबर 1923 साली जन्म झाला. ते सातवीपर्यंत शिकले होते. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत खूप मोठे योगदान आहे. शाहीर साबळे हे कवी, गीतकार, संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते आणि दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक देखील होते. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात होते. Also Read - Siddharth Jadhav Photoshoot: मराठमोळ्या 'सिद्धू'चा स्टाईलिश लूक, फोटो पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

शाहीर साबळे यांनी ‘महाराष्ट्राची लोकधार’द्वारे (Maharashtra Lokdhara) मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले होते. त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची तोफ असे देखील म्हटले जात होते. शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात (social work) बालपणीच सहभाग घेतला होता. त्यांनी अनेक समाजप्रबोधन करणारी प्रहसनं लिहिली आहेत. तसंच त्यांनी अनेक दर्जेदार लोकगीतं महाराष्ट्राला दिली आहेत.