Shahrukh Khan Viral Photo: शाहरुख खानच्या व्हायरल फोटोचं होतंय कौतुक, नेटिझन्स म्हणाले - 'हाच आहे सर्वधर्म समभाव'
Shahrukh Khan Viral Photo: शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना अखेरचा निरोप दिला तर त्याची मॅनेजर पूजा ददलानीने हात जोडून प्रार्थना करत लतादीदींना शेवटचा निरोप दिला.

Shahrukh Khan Viral Photo : गानसम्राज्ञी लता मंगेशकर याचे रविवारी निधन (Lata Mangeshkar passed away) झाले. वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park Maidan) शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. आर्मी (Army), नेव्ही (Navy) आणि एअरफोर्सचे (Airforce) अधिकारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राजकारणी (Politician), बॉलीवूड (Bollywood) आणि क्रीडा (Sports) क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रितपणे लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Actor Shahrukh Khan) उपस्थिती लावली होती. शाहरुख खानचा लतादीदींना अखेरचा निरोप देतानाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Also Read:
These two pictures is enough to tell you who is Shah Rukh Khan ❤️🇮🇳 pic.twitter.com/OqFK54xVAH
— VEER ❤️ (@veersrkian555) February 6, 2022
लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे पार्थिव ठेवलेले्या मंचावर अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पुजा ददलानी गेली होती. यावेळी शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना अखेरचा निरोप दिला तर त्याची मॅनेजर पूजा ददलानीने (Shahrukh Khan Manager Pooja Dadlani) हात जोडून प्रार्थना करत लतादीदींना शेवटचा निरोप दिला. शाहरुख खानने दुवाँ मागितल्यानंतर हात जोडूनही नमस्कार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसत आहे की, शाहरुख प्रथम लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर फुलांचा हार अर्पण करतो आणि त्यानंतर लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्यावर फुंकर मारतानाही दिसतो.
शाहरुख खानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानीचा प्रार्थना करतानाचे फोटो पाहून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओचे खूपच कौतुक होत आहे. हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) या दोन्ही पद्धतीने प्रार्थना केल्याने शाहरुख खानचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हाच आहे सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्ष भारताचे उत्तम उदाहरण अशा प्रकारच्या कमेंट्सच नेटिझन्स करत आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या