Top Recommended Stories

‘Shamshera’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, रणबीर कपूर आणि संजय दत्तनं वेधलं सर्वांचं लक्ष!

Shamshera Trailer : शमशेरा ट्रेलरमधील अभिनेता रणबीर कपूर आणि संजय दत्तचा अनोखा अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यशराज मुव्हीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या रणबीरचा हा चित्रपट 1800 च्या दशकातील कथा आहे. ज्यामध्ये तो आपल्या स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी ब्रिटिशांशी लढताना दिसणार आहेत.

Published: June 24, 2022 8:36 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Shamshera Trailer
Shamshera Trailer

Shamshera Trailer : बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी चित्रपट ‘शमशेरा’ (Shamshera Movie) प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. रणबीर कपूरचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझरनंतर (Shamshera Teaser) सर्वजण ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर रिलीज (Shamshera Trailer) करण्यात आला आहे. रिलीज होताच अवघ्या काही तासांमध्येच या ट्रेलरला मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) शमशेराच्या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट येत्या 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शमशेरा ट्रेलरमधील अभिनेता रणबीर कपूर आणि संजय दत्तचा अनोखा अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लांबसडक दाढी, वाढलेले केस, हातात कुऱ्हाड आणि चेहऱ्यावरचे हावभाव असा रणबीर कपूरचा ट्रेलरमधील अंदाज खूपच जबरदस्त आहे. तर अभिनेता संजय दत्तचा लूकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संजय दत्त या चित्रपटात जरा वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. त्याची ही भूमका आणि हा लूक आपण कधीच पाहिलेला नाही. संजय दत्तने याआधी रुपेरी पडद्यावर अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका जरा हटके आहे.

You may like to read

‘शमशेरा’ या अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक सर्वांनाच भुरळ घालत आहे. ट्रेलरमधील रणबीरचा आताचा लूक  खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यशराज मुव्हीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या रणबीरचा हा चित्रपट 1800 च्या दशकातील कथा आहे. ज्यामध्ये तो आपल्या स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी ब्रिटिशांशी लढताना दिसणार आहेत. इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळवण्यासाठी सुरु असलेली लढाई या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>