Top Recommended Stories

Sharad Ponkshe आणि Aadesh Bandekar यांचे सोशल मीडिया वॉर, पोस्ट करत म्हणाले - 'मी कधीही काहीही विसरत नाही'

Sharad Ponkshe Post : आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर हा शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर सुरु झाले आहे. शरद पोंक्षे यांचे 'दुसरं वादळ' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचा फोटो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा पुष्पगुच्छ देतानाचा एक फोटो शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला होता.

Published: June 28, 2022 1:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Sharad Ponkshe And Aadesh Bandekar
Sharad Ponkshe And Aadesh Bandekar

Sharad Ponkshe Post : शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण आले आहे. अनेक शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) आणि मंत्र्यांनी (Shivsena Ministers) त्यांना पाठिंबा देत शिंदे गटात सहभाग घेतला. अशामध्ये आता राजकीयच नाही तर सिनेसृष्टीतील कलाकर देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी अभिनेता शरद पोंक्षेंनी (Actor Sharad Ponkshe ) एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला होता. शरद पोंक्षेंच्या पोस्टनंतर शिवसेनेचे नेते आणि अभिनेता आदेश बांदेकर (Actor Aadesh Bandekar) यांनी शरद पोंक्षेंचा यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना सवाल केला होता. यावर आता शरद पोंक्षेंने आदेश बांदेकरांना उत्तर दिले आहे.

Also Read:

आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर हा शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर सुरु झाले आहे. शरद पोंक्षे यांचे ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचा फोटो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा पुष्पगुच्छ देतानाचा एक फोटो शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले होते, ‘कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय’ एकनाथ शिंदे यांनी ही पोस्ट सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले असताना केली.

You may like to read

त्यानंतर आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये कॅन्सरशी झुंझ देत असताना आदेश बांदेकर यांनी त्यांना मदत केली तसंच माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदत केली असल्याचा उल्लेख शरद पोंक्षे करताना दिसत आहेत. या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत आदेश बांदेकरांनी त्याला कॅप्शन देत ‘हा शरद पोंक्षे तुच ना?’ असा सवाल केला होता. आता आदेश बांदेकरांच्या या सवालाला शरद पोंक्षे यांनी उत्तर दिले आहे.

शरद पोंक्षें यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या पुस्तकाच्या पानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या पानावर शरद यांनी त्यांच्या कर्करोगाविषयी सांगितले. कशाप्रकारे सगळ्यात आधी त्यांना आदेश बांदेकर यांची आठवण आली आणि ते त्यांच्यासाठी कसे धावून आले. यावेळी आदेश बांदेकर यांचे कौतुक करताना शरद पोंक्षेंनी पुस्तकात लिहले आहे की, ‘असा हा आदेश, सहृदयी माणूस!’ आपल्या पुस्तकाचा फोटो शेअर करत शरद पोंक्षेंनी कॅप्नशमध्ये ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही’, असे लिहिले आहे. यासोबतच त्यांनी आदेश बांदेकर यांना टॅगही केले आहे. शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.