Top Recommended Stories

Sharman Joshi Birthday: बॉलिवूडमधील खलनायकाचा जावई आहे शर्मन जोशी, अशी सुरू झाली लव्ह स्टोरी!

Sharman Joshi  Birthday : शर्मन जोशी (Sharman Joshi) याने विनय शुक्ला (Vinay  Shukla) यांचा आर्ट चित्रपट 'गॉड मदर' (God Mother Movie) या चित्रपटातून डेब्यू केला होता. अमीर खान (Aamir Khan ) सोबतच्या 'थ्री इडिएट्स' ( 3 Idiots ) चित्रपटातून शर्मनला खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्याला फिल्म फियरचा बेस्ट सपोर्टिंग अवॉर्ड मिळाला होता.    

Updated: April 28, 2022 12:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Sharman Joshi Birthday: बॉलिवूडमधील खलनायकाचा जावई आहे शर्मन जोशी, अशी सुरू झाली लव्ह स्टोरी!
Sharman Joshi Birthday : ‘रंग दे बसंती’ ( Rang De Basanti ), ‘गोलमाल’ ( Golmaal ), ‘थ्री इडियट्स’ ( 3 Idiots ) सारख्या चित्रपटातून दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मानवर राज्य करणार बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशींचा (Sharman Joshi ) आज, 28 एप्रिलला वाढदिवस आहे. मराठी कुटुंबातील शर्मन जोशी यांचे वडील अरविंद जोशी ( Arvind Joshi ) गुजराती थिएटरचे प्रसिद्ध रंगकर्मी होते. त्यामुळे घरातूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते.

शर्मन याची बहीण मानसी जोशी (Manasi Joshi ) ही देखील अभिनेत्री असून त्या टीव्ही आणि चित्रपटात काम करते. असा हा शर्मन बॉलिवूडमधील एका खलनायकाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. नुसता प्रेमात पडला नाही तर त्याने त्या मुलीशी विवाह देखील केला आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेवूया शर्मन जोशी याच्या रंजक लव्ह स्टोरी बाबत.

28 एप्रिल 1979 रोजी मुंबईत जन्मलेला शर्मन जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेता होता तेव्हा कॉलेजमध्ये त्याची ओळख प्रेरणा चोपड नावच्या मुलीसोबत झाली. पहिल्याच भेटीत शर्मनला त्या मुलीवर प्रेम झाल होत. प्रेरणा ही दुसरी कोणी नाही तर बॉलिवूडच खलनायक प्रेम चोपडा यांची मुलगी आहे. हळूहळू कॉलेज लाईफमध्ये शर्मन आणि प्रेरणा दोघे बेस्ट फ्रेंड बनले. बेस्ट फ्रेंड असली तरी शर्मन याने मनातल्यामनात प्रेरणा हिला आपली जीवनसाथी मानून घेतलं. कालांतराने दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली देत दोघे डेट करू लागले. त्यानंतर 15 जून 2000 रोजी दोघे लग्नाच्या बेडीत आडकले. याच वर्षी शर्मनला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता. शर्मनने विनय शुक्ला यांच्या ‘गोड मदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर शर्मनने मागे वळून पहिले नाही. बॉलिवूड सुपरस्टार अमीर खान सोबत आलेल्या त्याच्या ‘थ्री इडिएट्स’ चित्रपटातील भूमिकेमुळे शर्मन प्रेक्षकांच्या मनावर राज करू लागला आहे. या चित्रपटासाठी शर्मनला बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर हा अवॉर्ड मिळाला होता.

शर्मन आणि प्रेरणाला आहेत तीन मुले

 शर्मन जोशीच्या फॅमिलीविषयी बोलायचे झाल्यास शर्मन आणि प्रेरणा यांना तीन मुले आहेत. एक मुलगी खयाना जोशी आणि दोन मुल वार्यान जोशी, विहान जोशी आहे. प्रेरणा बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी असली तरी तिला अभिनयात रुची नाही. ती बिझनेस करते. 

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 28, 2022 12:32 PM IST

Updated Date: April 28, 2022 12:35 PM IST