मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (TV Actor Sidharth Shukla) अचानक निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीवर (RIP Sidharth Shukla) अजूनही त्याच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थच्या निधनाचा सर्वात जास्त धक्का बसला ते म्हणजे त्याची खास मैत्रीण शहनाज गिलला. शहनाज गिलचे (Actress Shehnaaz Gill) गेल्या काही दिवसांपासून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. शहनाजची अवस्था पाहून तिचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. सतत रडून रडून शहनाजची खूपच वाईट अवस्था झाली आहे. अशामध्ये आता तिच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.Also Read - Shehnaaz Gill Video: सतत सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतेय शहनाज गिल, पाहा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ

Also Read - PHOTOS: Siddharth Shuklaच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या Shehnaaz Gillचे रडून रडून झाले असे हाल!

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) अचानक सर्वांना सोडून निघून गेला. त्याच्या अचानक निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर त्याच्या घरी गेलेला प्रत्येक जण शहनाजची अवस्था पाहून अस्वस्थ झाले आहेत. याच दरम्यान शहनाजच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने खाणं-पिणं सोडून दिले आहे. सध्या ती ग्लूकोजवर आहे असे म्हटले जात आहे. पण यामध्ये किती तथ्य आहे याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. Also Read - शहनाज गिलच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा!

दरम्यान, शहनाज गिलच्या फॅन पेजवर तिचा डिझायनर केन फर्न्ससोबत झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. या चॅटमध्ये केनला विचारण्यात आले आहे की, लोकं म्हणत आहे की ती ग्लुकोजवर आहे हे खरं आहे का? मला माहिती आहे की तुम्ही तिची चांगली काळजी घेत आहेत तरी सुद्धा मी हेच सांगेल की तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जर सनाची तब्येत ठीक असेल तर किमान एक प्रतिक्रिया दे. यावर केनने शहनाज गिल ग्लुकोजवर असल्याचे नाकारले आहे. दरम्यान, एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली आहे की, जेव्हा सुरुवातीचे दोन दिवस शहनाजने जेवण केले नाही तेव्हा ती ग्लूकोजवर होती. पण ती आता ग्लुकोजवर नाही.