Top Recommended Stories

Shraddha Kapoor आणि Rohan Shresthaचा ब्रेकअप, लग्न करणार असल्याची उडाली होती अफवा!

Shraddha Kapoor And Rohan Shrestha Breakup : गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. पण दोघांनी कधीही आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे सांगितले नाही.

Updated: March 25, 2022 1:38 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Shraddha Kapoor And Rohan Shrestha Breakup
Shraddha Kapoor And Rohan Shrestha Breakup

Shraddha Kapoor And Rohan Shrestha Breakup : बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरीबद्दल सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होत असतात. प्रेक्षकांना या सेलिब्रिटींच्या जोड्या देखील सुद्धा खूप आवडत असतात. पण अनेकदा त्यांच्यामध्ये ब्रेकअप सुद्धा होते आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसतो. अशामध्ये आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) जोरदार चर्चा सुरु आहे. श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. कारण श्रद्धा कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ (Rohan Shrestha) यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे. रोहन श्रेष्ठसोबतच्या ब्रेकअपच्या (Shraddha Kapoor And Rohan Shrestha Breakup) दरम्यान श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिचे चाहते सोशल मीडियावर तिला प्रश्न विचारून या बातम्यांमागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांनी आपलं चार वर्षांचं नातं संपवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. पण दोघांनी कधीही आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे सांगितले नाही. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे देखील बोलले जात होते. श्रद्धा आणि रोहन कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही चार वर्षांपासून एकमेंकाना डेट करत होते. मात्र आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे श्रद्धाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

You may like to read

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टमध्ये श्रद्धा आणि रोहन यांचा मार्ग आता वेगळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या दोघांच्या जवळच्या सूत्राने पोर्टलला सांगितले की, रोहन श्रेष्ठ गोव्यात श्रद्धा कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला नव्हता. रिपोर्टनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारी 2022 पासून दोघांमध्ये वाद सुरू होता आणि फेब्रुवारीमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अभिनेत्री लवकरच रणबीर कपूरसोबत एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.