Shreyas Talpadeने 'श्रीवल्ली' गाण्यावर Allu Arjun स्टाईलने केला जबरदस्त डान्स, एकदा व्हिडिओ बघाच!
Shreyas Talpade Dance On Srivalli Song: पुष्पा चित्रपटाला आवाज देणाऱ्या मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने श्रीवल्ली गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreyas Talpade Dance On Srivalli Song : साऊथ सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुनचा (Actor Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ (Pushpa Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. सध्या सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटातील डालॉग्ज असो किंवा गाणी यावर व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जात आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं (Srivalli Song) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर रिल्स तयार करुन ते इन्स्टावर शेअर केले जात आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर व्हिडिओ तयार केले आहेत. आता या चित्रपटाला आवाज देणाऱ्या मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने (Actor Shreyas Talpade) या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Also Read:
- Nag Nagin Live Pranay Video: नाग-नागिणीचा प्रणय तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून व्हाल मंत्रमुग्ध
- Disha Patani Latest Bikini Pics: दिशा पाटनी पुन्हा एकदा बिकिनी अवतारात चाहत्याच्या भेटीला, दिल्या किलर पोझ
- Nagpur Crime: अत्यंत घृणास्पद! नागपूरमध्ये कुत्रीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाला बेड्या
View this post on Instagram
पुष्पा चित्रपट हिंदीमध्ये हिट होण्यामागचे कारण म्हणजे मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे. श्रेयस तळपदेने या चित्रपटाला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदेने अतिशय कमाल केली असून या चित्रपटात त्याने दिलेल्या आवाजाचे खूपच कौतुक होत आहे. श्रेयस तळपदे लवकरच ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून (Aapadi Thapadi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात संदीप पाठक (Actor Sandeep Pathak) हा अभिनेता दिसणार आहे. सध्या कोकणामध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. संदीप पाठकने श्रेयससोबत शूटिंग दरम्यान ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
संदीप पाठकने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘मी सध्या कोकणात श्रेयस तळपदेसोबत आपडी थापडी चित्रपटाचे शुटींग करतोय. पुष्पा चित्रपटात श्रेयसने अल्लू अर्जुनला जो आवाज दिला आहे तो कमाल आहे. ती फिल्म हिदींत हीट होण्यामागे श्रेयसचं खूप मोठं Contribution आहे. तो सेटवर असताना पुष्पाच्या गाण्यावर रील करायचा मोह कुणाला नाही होणार, मलासुध्दा झाला.. धन्यवाद श्रेयस.’ श्रेयस आणि संदीपच्या या डान्स व्हिडिओला दोघांच्या चाहत्यांनी खूप लाइक्स करत जोरदार कमेंट्स केल्या आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या