Top Recommended Stories

Shweta Tiwari Apologies: अखेर श्वेता तिवारीने त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी, म्हणाली...

Shweta Tiwari Apologies: आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान श्वेता तिवारीने देवाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे श्वेता तिवारीवर जोरदार टीका होत आहे.

Updated: January 29, 2022 9:21 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Shweta Tiwari Apologies
Shweta Tiwari Apologies

Shweta Tiwari Apologies: टीव्ही अभिनेत्री (TV Actress) श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत (Shweta Tiwari In Controversy) आहे. आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान श्वेता तिवारीने देवाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे श्वेता तिवारीवर जोरदार टीका आणि सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल (Shweta Tiwari Trolled) केले जात आहे. अखेर या वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या निवेदनात श्वेता तिवारीने सांगितले की, ‘माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला आहे. पण माझ्या बोलण्याने किंवा माझ्या कृतीने कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही मी नकळत लोकांना दुखावले आहे. त्यामुळे मी सर्वांची माफी मागते.’

Also Read:

श्वेता तिवारीने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘माझ्या लक्षात आले आहे की माझ्या एका सहकाऱ्याशी संबंधित माझ्या वक्तव्याचा हवाला देत विपर्यास करून ते मांडले गेले आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. व्हिडिओ नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या लोकप्रिय पात्रासाठी मी ‘देव’ हा शब्द वापरला आहे. लोक अनेकदा एखाद्या अभिनेत्याचे नाव त्याच्या पात्राशी जोडतात आणि अशा परिस्थितीत मी माध्यमांशी संवाद साधताना हेच उदाहरण वापरुन बोलले होते. पण माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला. हे खूपच खेदजनक आहे. माझी देवावर खूप श्रद्धा आहे आणि एक भक्त म्हणून माझ्याकडून जाणूनबुजून किंवा इतर कोणत्याही प्रकारे असा प्रकार होणे शक्य नाही. तसंच, नकळत एखाद्याच्या भावना दुखावण्याचे कृत्य मी करणार नाही.’

You may like to read

श्वेता तिवारी आगामी बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या (Show Stoper Web Series) प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी ती भोपाळमध्ये (Bhopal) आली होती. या वेब सीरिजमध्ये श्वेता तिवारीसोबत रोहित रॉय (Actor Rohit Roy), सौरभ जैन (Actress Saurabh Jain) हे मुख्य भूमिकेत आहेत. यावेळी मुलाखती दरम्यान श्वेता तिवारीने ‘माझ्या ब्राचे माप देव घेतोय’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे ती चांगलीत वादात सापडली आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी (Home Minister of Madhya Pradesh) याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. श्वेता तिवारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्यावर टीकेची झोड सुरु आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 29, 2022 9:19 AM IST

Updated Date: January 29, 2022 9:21 AM IST