By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Siddhant Chaturvedi Birthday : हिरो होण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदीने 5 वर्षे दिले ऑडिशन, असा आहे त्याचा स्ट्रगल!
Siddhant Chaturvedi Birthday : सिद्धांत चतुर्वेदी हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. सिद्धांत चतुर्वेदीला बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला आहे. 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीसाठी हा प्रवास सोपा नव्हता.

Siddhant Chaturvedi Birthday : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) त्याच्या ‘गेहराईं’ या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे सिद्धांतला खूप प्रसिद्धी मिळाली. आज सिद्धांत चतुर्वेदी आपला वाढदिवस (Siddhant Chaturvedi Birthday) साजरा करत आहे. सिद्धांत चतुर्वेदीला बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला आहे. ‘गली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Siddhant Chaturvedi Birthday Special) त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया…
सीएचे शिक्षण सोडल्यानंतर अभिनयाला केली सुरुवात –
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी जो गली बॉयमध्ये रॅपर एमसी शेरच्या भूमिकेत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रसिद्धीस आला होता. त्याला सध्या परिचयाची गरज नाही. बॉलीवूडसाठी पूर्णपणे बाहेरचा माणूस असलेल्या सिद्धांतला प्रसिद्धीझोतात येण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागला होता. सिद्धांतचा जन्म उत्तर प्रदेशातील बलिया येथे झाला होता. अभिनयात हात आजमावण्यापूर्वी सिद्धांत चतुर्वेदी सीएचे शिक्षण घेतले होते पण अभिनेता होण्यासाठी त्याने शिक्षण सोडून ऑडिशन देण्यास सुरुवात केली.
‘इनसाइड एज’च्या यशानंतर गली बॉय –
उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी असलेला सिद्धांत चतुर्वेदी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी जवळपास एक वर्ष त्याच्या हातात काहीच काम नव्हते. अभिनेता होण्यासाठी त्याने अभ्यास सोडला आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली. सिद्धांतने एक-दोन वर्षांसाठी नव्हे तर पाच वर्षांसाठी ऑडिशन दिले त्यानंतर त्याला ‘इनसाइड एज’ या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिथे त्याच्या कामाची चाचणी घेण्यात आली आणि झोया अख्तरने त्याच्या कौशल्याची चाचणी घेतली आणि गली बॉयची ऑडिशन देण्यासाठी बोलावले.
Trending Now
सिद्धांतला करावा लागला खूप संघर्ष –
स्वत: सिद्धांतने त्यांच्या जीवन संघर्षाची ही कहाणी सांगितली आहे. सिद्धांतने सांगितले की, शाहरुख खानच्या ‘जोश 2’ या हिट चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तो दिवसभर लांबच लांब रांगेत उभा होता. पण संध्याकाळपर्यंत त्याचा नंबर आला नाही. खरं तर, सायरस ब्रोचाला दिलेल्या यूट्यूब मुलाखतीदरम्यान, त्याने सांगितले की, ‘मी जोश 2 चित्रपटाच्या ईगल गँगच्या ऑडिशनसाठी गेलो होतो. ही 4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लाइनमध्ये बरीच मुलं होती, मी विचारलं तिथे काय चाललंय, त्यांनी सांगितलं की जोश २ साठी ऑडिशन चालू आहे. मी दिवसभर त्या लाईनमध्ये उभा होतो पण ऑडिशनसाठी माझा नंबरच आला नाही.
नव्या नंदासोबत अफेअरची चर्चा –
सिद्धांत चतुर्वेदी आपल्या ‘गली बॉय’ आणि ‘गहराई’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामुळे सिद्धांतला स्वत:ची ओळख मिळाली. सिद्धांत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. सिद्धांत चतुर्वेदी आपल्या कामामुळे चर्चेत आहेच त्यासोबत तो आपल्या प्रेमप्रकरणामुळे खूप चर्चेत आहे. होय हे खरं आहे. कारण त्याचे नाव बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिच्याशी जोडले जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या