मुंबई: ‘बिग बॉस’च्या 13 व्या (Bigg Boss 13) सीझनचा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla Passed Away) अकाली निधनानंतर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थचं हृदयविकारानं (Heart Attack) निधन झाल्याचं बोललं जात आहे. सिद्धार्थ रात्री औषधी घेऊन झोपला होता. मात्र तो सकाळी उठलाच नाही. सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. अशातच सिद्धार्थची अखेरची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.Also Read - Shehnaaz Gill Video: सतत सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतेय शहनाज गिल, पाहा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ

सिद्धार्थनं इंस्टाग्रामवर 24 ऑगस्टला एक पोस्ट केली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थनं या पोस्टमध्ये ‘फ्रंटलाइन वर्कर्स’चे (frontline workers) आभार मानले आहे.
Also Read - PHOTOS: Siddharth Shuklaच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या Shehnaaz Gillचे रडून रडून झाले असे हाल!

सिद्धार्थनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही आमच्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालतात. अगणित तास काम करतात. अशा रुग्णांचं सांत्वन करतात, जे त्यांच्या कुटुंबीयांसोबत नाहीत. आपण खरोखर धाडसी आहात! Also Read - Sidharth Shukla Death:सिद्धार्थ शुक्लाचं हार्टअटॅकनं निधन, शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे करू नका दूर्लक्ष


बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सिद्धार्थच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली होती. सिद्धार्थ एक मेगा स्टार बनला होता. सिद्धार्थ आपलं अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता. एका मॉडेलच्या रूपात त्यानं करियरची सुरूवात केली होती. सन 2004 मध्ये त्यानं अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. 2008 मध्ये तो ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत दिसला. पण, ‘बालिका वधू’ मालिकेनं सिद्धार्थला खरी लोकप्रियता मिळवून दिली होती.