By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
...म्हणून करण्यात आली Sidhu Moose Wala ची हत्या, कॅनडातल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली जबाबदारी!
Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर अवघ्या तीन तासांतच त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकरण्यात आली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने (goldie brar ) फेसबुक पोस्टद्वारे सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या फेसबुक पोस्टद्वारे गोल्डी ब्रारने हत्येमागचे कारण देखील सांगितले आहे.

Sidhu Moose Wala Murder Case : सुप्रसिद्ध पंजाबी गायक (Punjabi Singer) आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Congress Leader Sidhu Moose Wala ) यांची रविवारी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. पंजाब सरकारने (Punjab Government) त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशीच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात सिद्धू मुसे वाला यांचा मृत्यू (Sidhu Moose Wala Death ) झाला. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहर के या त्यांच्या गावातून जीपमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या (Sidhu Moose Wala Murder Case ) करण्यात आली. हल्ल्यानंतर काही तासांमध्येच सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमागचे कारण समोर आले आहे.
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर अवघ्या तीन तासांतच त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकरण्यात आली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने (goldie brar ) फेसबुक पोस्टद्वारे सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या फेसबुक पोस्टद्वारे गोल्डी ब्रारने हत्येमागचे कारण देखील सांगितले आहे. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये गोल्डी ब्रार फरार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फरीदपूर येथील न्यायालयाने जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. सध्या गोल्डी ब्रार कॅनडामध्ये आहे.
गैंगस्टर गोल्डी बरार ने ली सिद्धू मूसेवाला की हत्या की जिम्मेदारी #sidhumoosewala pic.twitter.com/K9dX9PSrFE
— Prabhat Upadhyay (@prabhatup) May 29, 2022
गोल्डी ब्रारने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘सर्व भावांना राम राम, सत् श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे. आमच्या साथीदाराच्या हत्येप्रकरणी मुसे वालाचे नाव समोर आल्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कारण मुसे वालाची जास्त ओळख असल्यामुळे त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही. त्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे.’ दरम्यान, सिद्धू मुसे वाला यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या