Top Recommended Stories

Singer KK Dies: प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आला हार्ट अटॅक

Singer KK Dies: प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान आला हार्ट अटॅक: प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांचं निधन झालं आहे. कोलकात्यात एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना केकेची प्रकृती अचानक खालावली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयातून त्यांच्या मृत्यूची (Singer KK Died) बातमी आली आहे. केके हे बॉलीवूडमधलं एक प्रसिद्ध नाव होतं. केकेचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ होतं. परंतु केके याच नावाने तो प्रसिद्ध झाला.

Updated: June 1, 2022 12:55 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Singer KK Dies: प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आला हार्ट अटॅक
Famous singer KK passed away

Singer KK Dies:: प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांचं निधन झालं आहे. कोलकात्यात एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना केकेची प्रकृती अचानक खालावली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयातून त्यांच्या मृत्यूची (Singer KK Died) बातमी आली आहे. केके हे बॉलीवूडमधलं एक प्रसिद्ध नाव होतं. केकेचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) होतं. परंतु केके याच नावाने तो प्रसिद्ध झाला.

Also Read:

You may like to read

केकेनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तो तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध होता. मृत्यूच्या काही काळ आधी तो एका कॉन्सर्टमध्ये लाईव्ह फरफॉर्म करत होता. परंतु या कार्यक्रमातच त्याला हृदयविकारा झटका आला आणि त्याचे निधन (Famous Singer KK Has Passed Away) झाले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तो 53 वर्षांचा होता. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून केकेने पार्श्वगायनात आपले करियर सुरू केले होते. बॉलीवूड व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये त्याने गाणी रेकॉर्ड केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केकेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्वीट करून म्हटले की “केके नावाचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्याच्या गाण्यांमध्ये भावनांचे विस्तृत चित्रण होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति संवेदना. ओम शांती”

केकेने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत बॉलीवूडमधील सर्व मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली. हम दिल दे चुके सनममध्ये सलमान खानवर चित्रित केलेल्या तडप-तडप या गाण्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली. रणबीर कपूरच्या ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातील खुदा जाने या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. काईट्स, हम दिल दे चुके सनम, बचना ए हसीनो, खट्टा मीठा, गँगस्टर अशा अनेक चित्रपटात त्याने गाणी गायली. त्याच्या आवाजातील खनक आणि सुरेलपणामुळे पार्श्वगायक म्हणून जगभरात त्याने ओळख निर्माण केली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.