मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या मधुर आवाजासाठी ओळखली जाणारी सिंगर नेहा कक्कर (Bollywood Singer Neha Kakkar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नेहा कक्कर आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तरुणपिढीला नेहाच्या गाण्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. तिनं कर्तुत्त्वाच्या जोरावर आज संगीत जगतातील (Music Industry) आघाडीच्या गायिकांमध्ये स्थान पटकावलं आहे. नेहानं गायकीसोबतचं आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना भूरळ घातली आहे. आता तर नेहानं हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. नेहानं काही फोटो (Neha Kakkar Hot Photos) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याच फोटोंनी खळबळ उडवून दिली आहे.

नेहा कक्कर तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती बाथरूममध्ये दिसत आहे. बाथरोब परिधान केलेली नेहा बाथटबवर बसली आहे. फोटोत नेहा खूप हॉट दिसत आहे. नेहाचा हा अवतार पाहून लोक रिएक्ट करताना दिसत आहेत.

‘नहा चुकी हूं अब दिन की पॉझिटिव्ह शुरुआत की जाए’, असं कॅप्सन देखील नेहानं फोटोखाली दिलं आहे. नेहाच्या क्यूटनेसचे आधीच लाखो दिवाने आहेत, आता तिच्या हॉटनेसची सर्वत्र चर्चा आहे.

नेहानं 2008 मध्ये मीत ब्रदर्सद्वारा कंपोझ करण्यात आलेला अल्बम ‘द रॉक स्टार’साठी पहिलं गीत गायलं होतं.