Top Recommended Stories

Sridevi Death Anniversary : श्रीदेवीच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय झालं होते? जाणून घ्या खोली क्रमांक 2201 चं रहस्य

हिंदी चित्रपट(bollywood) सृष्टीची चांदणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी (actress sridevi) यांना जगाचा निरोप घेऊन 4 वर्ष पूर्ण झाली आहे. चार वर्षा आधी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री त्यांचे अकस्मात निधन झाले.

Published: February 24, 2022 11:05 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Sridevi Death Anniversary: श्रीदेवीच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय झालं होते? जाणून घ्या खोली क्रमांक 2201 चं रहस्य

Sridevi Death Anniversary : हिंदी चित्रपट (Bollywood) सृष्टीची चांदणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी (actress sridevi) यांना जगाचा निरोप घेऊन 4 वर्षे पूर्ण झाली. म्हणजेच 24 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री त्यांचे अकस्मात निधन झाले. या घटनेनंतर बॉलिवूडसह चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. 54 वर्षाच्या श्रीदेवीला नेमकं काय झालं हा प्रश्न लोकांना अनेकदा पडतो. कारण मृत्यूच्या काही दिवसांआधी जवळच्या नातेवाईकाने जेव्हा बघितले तेव्हा श्रीदेवी ह्या अगदी ठणठणीत दिसत होता. त्यामुळे मृत्यूच्या ‘त्या’ रात्री असं काय घडलं की, बॉलिवूडच्या चांदणीला जगाचा निरोप घ्यावा लागला. यासह ज्या हॉटेलच्या खोलीत ही घटना घडली ;त्या’ खोलीचे नेमकं रहस्य तरी काय ? जाणून घेऊ या काय घडलं होत त्या रात्री.

Also Read:

श्रीदेवी ह्या पहिल्यांदा एकट्या विदेश ट्रीपला गेल्या होत्या. त्यांच्या जीवनातील ही पहिली आणि शेवटची ट्रिप ठरली. त्या रात्री नेमकं काय घडलं होत याबाबत श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी उलगडा केला होता. बोनी कपूर यांनी त्यांची मैत्रिण ट्रेड ऍनालिस्ट कोमल नाहाटा हिच्याशी श्रीदेवीच्या शेवटच्या त्या रात्री विषयी मनमोकळेपणाने गोष्ट सांगितली होती.

You may like to read

मृत्यूच्या दोन दिवस आधी पोहोचल्या होत्या दुबईला…

श्रीदेवी ह्या त्यांचा भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी दुबई गेल्या होत्या. बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी हे देखील श्रीदेवी यांच्या सोबत लग्नात सामील  झाले होते. मात्र लग्ननंतर दोघे मुंबई परत आले होते. तर श्रीदेवी दुबईतच थांबल्या होत्या. त्यानंतर दुबईच्या जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलच्या रूम नंबर 2201 मध्ये त्यांनी चेक इन केले. या हॉटेलमध्ये श्रीदेवी दोन दिवसांआधी आल्या होत्या. त्या आधी दुबईच्या करीब रसल खेमामध्ये त्या होत्या.

शॉपिंगसाठी केला होता मुक्काम…

बोनी कपूर यांनी कोमल नाहाटा यांना सांगितले की, श्रीदेवी दुबईतच थांबणार होती. कारण तिला मुलगी जानव्ही हिच्यासाठी शॉपिंग करायची होती. जानव्हीची शॉपिंग लिस्ट श्रीदेवी हिच्या मोबाईलमध्ये होती. मात्र काही करणास्तव 21 फेब्रुवारीला श्रीदेवी शॉपिंग करण्यासाठी जाऊ शकली नाही.

बोनी कपूरला म्हटलं ‘ मला तुमची आठवण येत आहे’…

24 फेब्रुवारी रोजी सकाळी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात बोलणं झालं होते. यावेळी श्रीदेवी म्हणाल्या ‘ मला तुमची आठवण येत आहे’  बोनी कपूर त्याच दिवशी सायंकाळी दुबई जाणार होते. मात्र सरप्राईज देण्यासाठी श्रीदेवीला याबाबत सांगितले नाही. जानव्हीला देखील दुबई जायचे होते. कारण तिला माहित होते आईला एकटी राहण्याची सवय नाही. त्यामुळे ती पासपोर्ट आणि आवश्यक दस्ताऐवज शोधत होती.

दुबई पोहचून दिले सरप्राईज…

बोनी कपूर यांनी दुबईतील जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलला पोहचून श्रीदेवीला सरप्राईज दिले. यावेळी बोनी कपूर यांनी डुप्लिकेट चावीने श्रीदेवीची रूम उघडली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. दोघे अर्धा तास गप्पा मारता होते. त्यानंतर बोनी कपूर फ्रेश होण्यासाठी गेले. बाथरूममधून बाहेर आल्यावर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना रोमॅंटिक डिनरला जायचे सांगितले. यावर श्रीदेवीने होकार देत त्या देखील तयार होण्यासाठी गेल्या.

बाथरूममधून परतल्या नाही श्रीदेवी…

श्रीदेवी ह्या तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या याचा वेळी बोनी कपूर लिव्हिंग रूममध्ये टीव्ही बघत होते. दरम्यान 15-20 मिनिटं होऊन देखील श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी आवाज दिला. दोन वेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बोनी कपूर बेडरुमध्ये गेले आणि त्यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. मात्र तरीही मधून आवाज आला नाही. श्रीदेवीचा जेव्हा आवाज आला नाही तेव्हा बोनी कपूर यांनी धक्का देऊन दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला मात्र, दरवाजा आतून बंद होता.

बाथरूममध्ये बाथटप पाण्याने पूर्णपणे भरले होते.आणि श्रीदेवी त्यात पूर्णपणे डुबलेल्या होत्या. श्रीदेवीची कुठलीही हालचाल होत नव्हती. त्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या मित्राला फोन केला. त्यानंतर त्यांनी रात्री 9 वाजता पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि डॉक्टरांनी हॉटेलमध्ये आल्यानंतर श्रीदेवीला मृत घोषित केले. दरम्यान, भारतीय दूतावासाने श्रीदेवी यांचा पासपोर्ट रद्द केला. 22 तासांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर  27 फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजता श्रीदेवीची बॉडी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 24, 2022 11:05 AM IST