Allu Arjun आणि Rashmika चा 'Pushpa'मधील Srivalli गाण्याचे भोजपुरी व्हर्जन रिलीज, Youtube वर करतेय धम्माल

'Srivalli' Song Bhojpuri version Out Now: साऊथचा लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) जबरदस्त चित्रपट 'पुष्पा' (Pushpa) सध्या देशात धम्माल करतोय.

Published: February 5, 2022 7:36 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Allu Arjun आणि Rashmika चा 'Pushpa'मधील Srivalli गाण्याचे भोजपुरी व्हर्जन रिलीज, Youtube वर करतेय धम्माल

‘Srivalli’ Song Bhojpuri version Out Now: साऊथचा लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) जबरदस्त चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) सध्या देशात धम्माल करतोय. पुष्पाने हिंदी ब्लेटवर 100 कोटींचा गल्ला जमवला आहे, तर वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 350 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रत्येकांच्या ओठांवर हेच गाणे आहे. या गाण्यावर रिल्स तयार करून ते इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने शेअर होत असताना आता दोन गायकांनी या गाण्याचे भोजपुरी व्हर्जन रिलीज केले आहेत.

Also Read:

गायक राहुल आणि मोहनने आपापल्या चॅनलवर ‘श्रीवल्ली’ गाण्याच भोजपुरी व्हर्जन शेअर केले आहे. राहुलने ‘श्रीवल्ली’चे टायटलला ‘गजब का रूप’ (Gajab Ka Roop) दिले आहे. तर ‘तोहर झलक श्रीवल्ली बटियां करे तू हर्फी’, हे मोहनचे बोल आहेत. या गाण्याला यूट्यूबवर (Youtube) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मात्र ‘श्रीवल्ली’चे भोजपुरी व्हर्जनला देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरलेले आहे. आता हे व्हर्जन हळूहळू इंटरनेटवर देखील व्हायरल होऊ लागले आहे.

गायकने राहुलने ‘श्रीवल्ली’चे ऑडिओ व्हर्जनमध्ये RR Records Bhojpuri यूट्यूब चॅनलवर तर मोहनने Mohan Babu Official वर रिलीज केले आहे. त्याचबरोबप ‘पुष्पा’च्या ओरिजनल व्हर्जनबाबत सांगायचे तर हिंदी व्हर्जनला यूट्यूबवर 15 कोटी लोकांनी पाहिला आहे. या गाण्याला गायक जावेद अलीने आवाज दिला आहे. तर तेलुगू व्हर्जन 3 कोटीहून जास्त वेळा पाहिले गेले असून ते गायक सिद श्रीराम यांनी गायले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 7:36 PM IST