Top Recommended Stories

Sumona Chakravarti Birthday: अमीर खानसोबत सुमोनाने करिअरला केली सुरुवात, गंभीर आजाराने त्रस्त असूनही चाहत्यांना भरभरून हसवते

Sumona Chakravarti Birthday : वयाच्या 11 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध आहे. टीव्ही जगतातील यशस्वी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. जीवनात अनेक चढ-उतार अनुभवलेल्या या अभिनेत्रीचा आज( 24 जून रोजी) वाढदिवस आहे.  

Published: June 24, 2022 2:57 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Sumona Chakravarti Birthday: अमीर खानसोबत सुमोनाने करिअरला केली सुरुवात, गंभीर आजाराने त्रस्त असूनही चाहत्यांना भरभरून हसवते

Sumona Chakravarti Birthday : टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) भुरीची भूमिका साकारून (Sumona Chakravarti) सर्वांना हसवणाऱ्या सुमोना चक्रवर्तीचा आज म्हणजेच 24 जून रोजी वाढदिवस (Sumona Chakravarti Birthday) आहे. 24 जून 1988 रोजी लखनऊमध्ये (Lucknow City) एका बंगाली कुटुंबात जन्मलेली सुमोना बऱ्याच कालावधीपासून टीव्हीवर काम करत आहे. ती सध्या कपिल शर्मा शोमध्येच दिसते. अनेक वर्षांपासून ती कपिलसोबतच काम करत आहे. कपिल आणि सुमोना ही जोडी ऑनस्क्रीन पती-पत्नी म्हणून प्रसिद्ध आहे. दोघांमधील विनोद प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माची चांगली मैत्रीण आहे. अशात आज सुमोनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक किस्से.

11 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू

सुमोनाचा जन्म 24 जून 1986 रोजी लखनऊमध्ये झाला. बंगाली कुटुंबातील सुमोनाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. सुमोना चक्रवर्ती टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने वयाच्या 11 व्या वर्षी आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘मन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सुमोनाने शिक्षणासाठी चित्रपटांमधून ब्रेक घेतला. त्यानंतर ती एकता कपूरच्या शोमधून तरुण कलाकार म्हणून परतली. बालपणात चित्रपटांचा भाग असलेल्या सुमोनाने एकता कपूरच्या प्रसिद्ध शो ‘कसम से’मधून टेलिव्हिजन जगतात प्रवेश केला. या शोमध्ये तिने ‘निवेदिता देब’ची भूमिका साकारली होती.

You may like to read

यासह सुमोनाने ‘डिटेक्टिव डॉल’, ‘सुन यार चिल मार’ कस्तुरीसह अनेक शोमध्ये काम केले. एकता कपूरच्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या शोमधून तिला मोठे यश मिळाले. सुमोनाला 2014 मध्ये इंडियन टेली अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

सिगारेटचे व्यसन

सुमोना एके काळी खूप सिगारेट ओढायची, पण गेल्या सहा वर्षांपूर्वी तिने स्मोकिंग सोडले आहे. याबाबत तिने स्वतः 2020 मध्ये एका मुलाखतीत खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, एका मित्राच्या पार्टीत तिने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय तिच्यासाठी कठीण होता, पण आज तिला स्मोकिंगची एवढी ऍलर्जी झाली आहे की कोणी सिगारेट ओढत असेल तिथे ती उभीही राहू शकत नाही.

या गंभीर आजाराशी सुरु आहे संघर्ष

सुमोना एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. सुमोनाने याबाबत स्वतः माहिती दिली की, ती स्टेज-4 एंडोमेट्रिओसिसशी झुंज देत आहे. सुमोनाने सांगितले होते की, या आजारामुळे तिला खूप अडचणी आणि वेदना सहन कराव्या लागत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.