Top Recommended Stories

Sunil Dutt Death Anniversary : रेडिओ जॉकी ते बॉलिवूड! असा होता सुनील दत्त यांचा प्रवास, जाणून घ्या रंजक किस्से

Sunil Dutt Death Anniversary : दिवंगत सुनील दत्त ( Sunil Dutt ) हे बॉलिवूडचे ( Bollywood ) नावाजलेले अभिनेते होते. रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात करत बॉलिवूडचे यशस्वी अभिनेते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

Published: May 25, 2022 12:44 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Sunil Dutt Death Anniversary : रेडिओ जॉकी ते बॉलिवूड! असा होता सुनील दत्त यांचा प्रवास, जाणून घ्या रंजक किस्से

Sunil Dutt Death Anniversary : दिवंगत सुनील दत्त ( Sunil Dutt ) हे बॉलिवूडचे ( Bollywood ) नावाजलेले अभिनेते होते. रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात करत बॉलिवूडचे यशस्वी अभिनेते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अशा या अष्टपैलू अभिनेत्याचे 25 मे 2005 रोजी निधन ( Sunil Dutt Death Anniversary ) झाले. सुनील दत्त आज आपल्यात नसले तरी त्याच्या आठवणी आजही जिवंत आहेत. 17 व्या स्मृती दिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या विषयी रंजक किस्से….

सुनील दत्त हे एक अभिनेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शकसह एक मुरब्बी राजकारणी देखील होते. सर्वांच्या मदतीला उभा राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती.  सुनील दत्त यांचा जन्म 6 जून 1929 रोजी पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील नाका खुर्द येथे झाला होता. ब्राह्माण परिवारातील दिवाण रघुनाथ आणि कुलवंती देवी यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर सुनील दत्त हे आपल्या परिवारासह हरियाणातील यमुना नगरच्या मंडोळी गावात स्थायीत झाले होते.

You may like to read

दरम्यान, घर खर्च भागविण्यासाठी सुनील दत्त एक ट्रान्सपोर्ट कंपनीत रात्रपाळीला काम करत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुनील दत्त यांना नाटकाची आवड निर्माण झाली दमदार आवाज आणि उर्दू भाषेवरील पकडमुळे त्यांना अभिनय करताना दाद मिळत होती. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान, सुनील दत्त यांच्या आवाजाने इम्प्रेस होत रेडिओ प्रोग्रामिंग हेड यांनी सुनील दत्त यांना नोकरीची ऑफर दिली होतो. नोकरीदरम्यान सुनील दत्त अभिनेत्यांच्या मुलाखत घेत होते. या मुलाखतचे त्यांना 25 रुपये मिळत.

असेच एकदा रेडिओमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा अभिनेत्री नरगिस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्याना कल्पनाही नव्हतं की येणाऱ्या काळात याच नरगिस त्यांच्या पत्नी होतील. मुलाखत घेत असताना सुनील दत्त खूप नर्वस होते. त्यावेळी नरगिसने सुनील दत्त यांना भीती न बाळगता मोकळ्या मानाने मुलाखत घेण्याचे सांगितल्यानंतर ही मुलाखत पार पडली होती. तर दिलीप कुमार यांची मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या सुनील दत्त यांच्यावर दिग्दर्शक समेश सहगल यांची नजर पडली आणि त्यांनी सुनील दत्त यांना स्किन टेस्टसाठी बोलावले. यानंतर त्यांनी सुनील दत्त यांना आगामी चित्रपटाची ऑफर दिली.

मदर इंडियापासून मिळाली खरी ओळख

रेल्वे प्लॅटफार्म चित्रपटानंतर सुनील कुंदन, एक ही रास्ता, राजधानी, किस्मत काय खेल अशा चित्रपटात सुनील दत्त यांनी काम केले. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 1957 मध्ये ‘मदर इंडिया’ या चित्रपटातून. या चित्रपटात सुनील दत्त नरगिस यांच्या मुलाच्या भूमिकेत होते. याच सेटवर त्याना नरगिसवर सोबत प्रेम झाले. दरम्यान, सेटवर झालेल्या अपघातात सुनील दत्त यांनी जीवाची पर्वा केली नाही. हे बघून नरगिस देखील त्यांच्या प्रेमात पडली. ‘मदार इंडिया’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुढच्या वर्षी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोघांना तीन मुले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.