Top Recommended Stories

Sushant Singh Rajput Birth Anniversary: रिया चक्रवर्तीने व्हिडिओ शेअर करत सुशांतसिंहच्या आठवणींना दिला उजाळा

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सुशांतसिंहसोबत जीममध्ये दिसते आहे. 'तुझी खूप आठवण येते', असे व्हिडिओखाली कॅप्शन देखील तिने लिहिले आहे.

Published: January 21, 2022 10:38 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Sushant Singh Rajput Birth Anniversary: रिया चक्रवर्तीने व्हिडिओ शेअर करत सुशांतसिंहच्या आठवणींना दिला उजाळा
सुशांत केस में रिया चक्रवर्ती फिर मुश्किल में

Sushant Singh Rajput Birthday today: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज वाढदिवस. ( Sushant Singh Rajput) सुशांतसिंहला जाऊन (Sushant Singh Rajput Suicide) दीड वर्षे होत आहे. सुशांतसिंह हा 14 जून 2020 रोजी वांद्रे (पश्चिम) येथील फ्लॅटवर मृतावस्थेत आढळून आला होता. सुशांत आज आपल्यात नसला तरी त्याच्या अनेक आठवणी आहेत, असे म्हणत चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आठवणींना उजाळा मिळवून दिला आहे. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Sushant Singh Rajput Girlfriend rhea chakraborty) ही देखील त्याला मिस करते आहे.

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Social Media post).आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सुशांतसिंहसोबत जीममध्ये दिसते आहे. ‘तुझी खूप आठवण येते’, असे व्हिडिओखाली कॅप्शन देखील तिने लिहिले आहे. या पोस्टवर रियाच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट करत दिवंगत स्टार सुशांतसिंहची आठवण काढली आहे.

You may like to read

अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटवर मृतावस्थेत आढळून आला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर NCB ने बॉलिवूडमधील ड्रग्जच्या कथित वापराप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू केली होती. सुशांत सिंहच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी रिया आणि तिचा भाऊ शौक चक्रवर्ती यांना अटक झाली होती. एक महिन्याहून अधिक काळ रिया चक्रवर्ती मुंबईच्या भायखळा कारागृहात (Mumbai Byculla Jail) कैद होती. सध्या तिची जामिनावर सुटका झाली आहे.


दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास देशातील तीन प्रमुख एजन्सीज करत आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI),नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि प्रवर्तन निदेशालाय (ED) करत आहेत. रिया चक्रवर्ती शेवटची ‘चेहरे’ या चित्रपटात दिसली होती. ‘चेहरे’ चे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे आणि त्यात इमरान हाश्मी देखील आहे जो बिझनेस टायकूनची भूमिकेत दिसला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.