मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’(Taaraka Mehta Ka Ooltah Chashmah) घरा-घरात पोहोचली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एवढंच नाही तर मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या हृदयात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, मालिकेतून अचानक गायब झालेली दया भाभी (Daya Bhabhi) अखेर सापडली आहे. ही नवी ‘दया भाभी’ कोण, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे.Also Read - Samsung Galaxy M52 5G : सॅमसंगच्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळत आहे 9 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

दया भाभी अर्थात दिशा वाकानी (Disha Vakani) हिनं ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. कारण ती गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब आहे. ‘ती माहेरी गेली आहे, असं जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर दया भाभीशी मिळताजुळता चेहऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नवी दया भाभी मिळाली, असा समज सगळ्यांनी करून घेतला आहे. त्यामुळे नवी दया भाभी पडद्यावर कधी दिसेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. Also Read - Mangal Gochar 2022 : मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा 'या' 4 राशींना होणार लाभ, येतील 'अच्छे दिन'  


व्हायरल व्हिडिओमधील तरुणी ही यु ट्यूबर गरिमा गोयल (Garima Goel) आहे. गरिमा ही दिशा वाकानीची लोकप्रिय भूमिका ‘दया भाभी’च्या गेटअपमध्ये दिसली. त्यामुळे तिच नवी दया भाभी आहे, असं प्रेक्षकांना वाटत आहे. मात्र, तसं नाही गरिमानं दया भाभीचा गेटअप केवळ तिच्या यूट्यूब ब्लॉगसाठी केला आहे. गरिमानं दया भाभीची वेशभूषा करून संपूर्ण दिवस अगदी त्याच्यामाणे घालवला. जेवण करण्यापासून ते उठणे-बसण्याबाबतची दया भाभीच्या स्टाईल कॉपी केली. Also Read - Karishma Kapoor Birthday : नवऱ्यापासून वेगळी होऊनही करिश्मा कपूर आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण!

कोण आहे गरिमा गोयल?

गरिमानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दया भाभीच्या लूकची एक झलक शेअर केली आहे. गरिमा गोयल ही ‘यु ट्यूबर’ तसेच एक अभिनेत्री आहे. ती अनेक जाहिरातीमध्ये यापूर्वी दिसली आहे. लोक तिचा यूट्यूब ब्लॉग्ज पाहायला पसंत करतात.