मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) सध्या वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एवढंच नाही तर मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या हृदयात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, दयाबेन (Dayaben) अर्थात दिशा वाकानी (Disha Vakani) मागील काही दिवसांपासून गायब झाली आहे.Also Read - Somvar Che Upay : जीवनातील संकट दूर करण्यासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, भगवान शंकराची राहिल कृपा

दयाबेननं आपल्या कॉमेडीमधून प्रेक्षकांना पोटधरून हसवलं आहे. दयाबेन दिसत नसल्यामुळे बहुतांश प्रेक्षक तिला मिस करत आहेत. दयाबेन कधी येणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना सोशल मीडियावरील एका व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. यात एक तरुणी दयाबेनची कॉपी करताना दिसत आहे. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 27 June : या राशीच्या लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

Also Read - Monkeypox Virus : चिंता वाढली! 50 हून अधिक देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स व्हायरस, WHO ने सांगितले...

दयाबेनच्या डुप्लीकेटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गरिमा गोयल (Garima Goyal) नामक एक यू ट्यूबर आहे. तिनंच दयाबेनची कॉपी केली आहे. इंटरनेटवर ‘दयाबेन’च्या गेटअपमध्ये गरिमाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गरिमानं 24 तासांसाठी तिच्या यूट्यूब ब्लॉगसाठी दयाबेनचा गेटअप केला होता. गरिमा दयाबेन म्हणूनच संपूर्ण दिवस वावरली होती. गरिमानं जेवण करण्यापासून ते उठणे-बसण्याबाबत दयाबेनची स्टाईल कॉपी केली आहे. या नव्या ‘दयाबेन’चा (Dayaben) व्हिडिओ पाहून फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे. जेठालालने गरिमाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याचं डोकंही गरगरलं असेल.

कोण आहे गरिमा गोयल?

गरिमानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दयाबेनच्या लूकची एक झलक शेअर केली आहे. गरिमा गोयल ही ‘यु ट्यूबर’ तसेच एक अभिनेत्री आहे. ती अनेक जाहिरातीमध्ये यापूर्वी दिसली आहे. लोक तिचा यूट्यूब ब्लॉग्ज पाहायला पसंत करतात.