Top Recommended Stories

Munmun Dutta Arrested: तारक मेहतामधील 'बबीता'ला अटक, 4 तासांच्या चौकशीनंतर जामिनावर सुटका!

Munmun Dutta Arrested: दलीत समाजाविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी एससी-एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Updated: February 8, 2022 11:03 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Munmun Dutta
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Munmun Dutta

Munmun Dutta Arrested: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्तासंदर्भात (Actres Munmun Dutta) महत्वाची बातमी समोर आली आहे. मुनमुन दत्ताला हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) अटक केली. चार तासांच्या चौकशीनंतर (Interrogation) जामिनावर तिची सुटका (Released on Bail ) करण्यात आली आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ताने एका कार्यक्रमामध्ये एका विशिष्ट जातीविरोधात चुकीचे वक्तव्य केले होते त्याच प्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलिस ठाण्यात (Hansi Police Station) पोहोचली. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Haryana High Court) दिलेल्या आदेशानुसार मुनमुन डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर हजर झाली. तिच्याविरोधात दलीत समाजाविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी एससी-एसटी कायद्याअंतर्गत (SC-ST Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी तिला अटक केली. चार तास चौकशीकेल्यानंतर जामिनावर मुनमुन दत्ताची सुटका करण्यात आली.

You may like to read

मुनमुन दत्ताविरुद्ध 13 मे 2021 रोजी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मुनमुनने या प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2021 रोजी ही याचिका फेटाळली होती. मुनमुनने युट्युबवर (YouToob) एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता. त्यामध्ये अनुसूचित जातींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर हांसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी मुनमुन दत्ताविरुद्ध हांसी पोलिस ठाण्यात एससी, एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, या व्हिडिओवरून झालेल्या वादानंतर मुनमुनने माफी सुद्धा मागितली होती. तिने ही पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली होती आणि आपल्याला हा शब्द माहित नसल्याचे म्हटले होते आणि अनवधानाने तो उच्चारला गेला असल्याचे सांगितले होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 11:02 AM IST

Updated Date: February 8, 2022 11:03 AM IST