Tiger Shroff Video: टायगर श्रॉफ सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? पाहा या व्हिडिओत असं काय घडलं
Tiger Shroff Video: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा चित्रपटातील अॅक्शन स्टंटमुळे कायम चर्चेत असतो. अशातच टायगरने आपल्या एका चाहत्या तरुणी सोबत असं काही कृत्य केलं की त्या प्रसंगाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकरी टायगरला ट्रोल करत आहे.

Tiger Shroff Video : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) हा चित्रपटातील अॅक्शन स्टंटमुळे कायम चर्चेत असतो. सध्या टायगर त्याच्या आगामी हिरोपंती 2 चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (Heropanti 2) व्यस्त आहे. अशातच टायगरने त्याची चाहती असलेल्या तरुणीसोबत असं काही वर्तन केलं की त्या प्रसंगाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी टायगरला चांगलाच ट्रोल केलं आहे. जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओत.
Also Read:
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटणे प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे अपूर्ण राहते. अशातच एका तरूणीचे आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या तरुणीचा आवडता सेलिब्रेटी दुसरा कोणी नाही तर अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) आहे. सध्या या तरुणीचा आणि टायगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टायगरने या तरुणीला मारलेली मिठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली तर काहींनी त्या तरुणीला आणि टायगरला ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
नेमकं झाला असं की टायगर श्रॉफ आपल्या आगामी चित्रपट हिरोपंती 2 (Heropanti 2) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील एका मॉलमध्ये गेला होता. तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, गर्दीमध्ये एका तरुणीला भोवळ आली. यावेळी जावळ असलेल्या लोकांनी तिला पाणी देऊन सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची टायगरला भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे टायगरने तिला जवळ बोलावलं आणि दोघांची भेट झाली. यावेळी टायगरने तीला मिठीत घेऊन तिची इच्छा पूर्ण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने, ‘टायगरला त्याची छोटी मुलगी भेटली…’ असं लिहिलं आहे. तर अनेकांनी ‘लहान मुलगी आहे का?’ अशी कमेंट केली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या