मुंबई: छोट्या पडद्यावरील दिग्गज एक्ट्रेस श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. कारण ती टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’च्या (Kasautii Zindagii Kay) माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.Also Read - Shweta Tiwari Hot Photoshoot: श्वेता तिवारीचे पुन्हा बोल्ड आणि हॉट फोटोशूट, मादक अदा पाहून चाहते घायाळ!

एरव्ही कायम चर्चेत राहणारी श्वेता आता मात्र, वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. श्वेताच्या हॉट अवतारानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

श्वेता तिवारीनं (Shweta Tiwari) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये श्वेतानं अत्यंत मादक पोझ दिल्या आहेत. श्वेतानं (Shweta Tiwari Hot) रेड स्लिट गाऊन कॅरी केला आहे. त्यात हाय स्लिट आहे. सोबत वन शोल्डर आणि कट्स असलेला ड्रेस तर अनेकांना घायाळ करणारा आहे.

श्वेतानं या फोटोंमध्ये सिझलिंग पोझ देखील दिल्या आहेत. चाळीशीत देखील श्वेतानं फिगर कमालीचं मेंटेन केलं आहे. सोशल मीडियावर सध्या श्वेताचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. श्वेताच्या हॉट अदांना भरपूर दाद मिळते आहे.

चाहते तर श्वेताच्या प्रत्येक फोटोवर रिएक्ट करत आहे. काह लोक म्हणत आहेत की, या फोटोमध्ये श्वेता तिच्या मुली पेक्षाही छोटी दिसते आहे.


श्वेता तिवारी ही बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस सीजन 4 ची विनर ठरली होती.