Top Recommended Stories

Russia Ukraine War: युक्रेनियन एक्ट्रेसने पाठीवर काढले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र, पाहा Photo

रशियाच्या (Russia) हल्ल्यानंतर यु्क्रेममध्ये  (Ukraine) हाहाकार उडाला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. रशियाने युक्रेनची राजधानी कीवचा ताबा घेण्याचा मानस आहे. कारण, सर्वाधिक हवाई हल्ले कीव शहरावर करण्यात आले आहेत. रशियाचा हल्ल्यांत युक्रेनमध्ये एका दिवसांत 137 नागरिकांचा मृत्यू झाला असून 316 जण जखमी झाल्याचा दावा रशियाने केला आहे.

Published: February 25, 2022 11:15 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Russia Ukraine War: युक्रेनियन एक्ट्रेसने पाठीवर काढले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र, पाहा Photo

Russia Ukraine War: रशियाच्या (Russia) हल्ल्यानंतर यु्क्रेममध्ये  (Ukraine) हाहाकार उडाला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. रशियाने युक्रेनची राजधानी कीवचा ताबा घेण्याचा मानस आहे. कारण, सर्वाधिक हवाई हल्ले कीव शहरावर करण्यात आले आहेत. रशियाचा हल्ल्यांत युक्रेनमध्ये एका दिवसांत 137 नागरिकांचा मृत्यू झाला असून 316 जण जखमी झाल्याचा दावा रशियाने केला आहे. अशातच युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझीनोवा (Ukrainian Actress Nataliya Kozhenova) ही चर्चेत आली आहे. नतालिया कोझीनोवा हिने तिच्या पाठीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi)आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांचे चित्र रेखाटले आहे. त्यामुळे सोशल मीडियात नतालिया सध्या चर्चेत आहे. तिचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे नतालिया कोझीनोवा?

नतालिया कोझीनोवा ही यु्क्रेनियन अभिनेत्री असून तिने ‘अतिथी तुम कब जाओगे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. नतालिया आता रशिया आणि युक्रेनमधील वादादरम्यान चर्चेत आली आहे. नतालियाने सन 2015 मध्ये तिच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांचे चित्र काढले होते. आता नतालियाचा हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

You may like to read

असा केला होता आनंद व्यक्त…

नतालियाने भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद व्यक्त केला होता. तिने आनंदाच्या भरात तिच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांचे चित्र रेखाटले होते. परंतु, आता रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष टोकाला पोहोचला असताना नतालियाचा तो फोटो पुन्हा चर्चेत आला आहे.

ती सध्या काय करतेय…?

नतालिया कोझीनोवा हिच्याबाबत सांगायचे झाल्यास ‘गंदी बात’ वेबसीरिजमधील बोल्ड सीनमुळे नतालिया वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती. नतालिया लवकरच ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नतालियाने आतापर्यंत अनेक हिंदी वेब सीरिजमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल स्टारर ‘अतिथी तुम कब जाओगे’ या चित्रपटात नतालिया पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ‘तेरे जिस्म से जान तक’, ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’ चित्रपटात देखील तिने काम केले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.