Utkarsh Shinde's Birthday : डॉक्टर असूनही संगीत क्षेत्रात रमला उत्कर्ष शिंदे, बहुगुणी गायकाचा आज वाढदिवस
डॉक्टर होऊनही संगीत क्षेत्रात रमलेला शिंदे घराण्यातील बहुगुणी गायक उत्कर्ष शिंदेचा आज वाढदिवस आहे. उत्कर्ष हा प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा आहे.

Singer Utkarsh Shinde’s birthday : डॉक्टर होऊनही संगीत क्षेत्रात रमलेला शिंदे घराण्यातील (Shinde family) बहुगुणी गायक उत्कर्ष शिंदेचा आज वाढदिवस आहे. उत्कर्ष हा प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे (Pralhad Shinde) यांचा नातू आणि आनंद शिंदे (Anand Shinde) यांचा मुलगा आहे. उत्कर्षचा जन्म 11 जानेवारी 1986 मध्ये मुंबई येथे झाला. शिंदे घराण्यात जन्म झाल्यामुळे उत्कर्षच्या रक्तामध्येच संगीत आहे. त्यामुळे पेशाने डॉक्टर असतानाही वडील आणि भावाच्या पावलावर पाऊल टाकत त्याने संगीत क्षेत्राची निवड केली. उत्कर्षचे ‘महामानवाची गौरव गाथा’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.
Also Read:
डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे (Singer Utkarsh Shinde) हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) हा उत्कर्षचा छोटा भाऊ आहे. या दोघा भावांनी मिळून अनेक भीम गीते, चित्रपट गीते आणि लोकगीते गायली आणि रचली आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेचे शीर्षक गीत आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी संगीतबद्ध केले होते.
राजकीय कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही तो सक्रिय आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा (Swarsamrat Pralhad Shinde Charitable Trust) उत्कर्ष अध्यक्ष आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने त्याने राज्यातील कलाकारांच्या समस्या महाराष्ट्र शासनासमोर मांडल्या होत्या आणि नोंदणीकृत ज्येष्ठ कलाकारांना राज्य सरकारकडून देण्यात येणारे मासिक मानधन कोरोनाच्या संकटामुळे बंद झाले हे निदर्शनास आणून दिले होते. तसेच या कलाकारांचे मानधन तातडीने द्यावे अशी मागणी त्यांने राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.
बहुगुणी गायक उत्कर्ष शिंदेचा परिचय (Utkarsh Shinde Biography)
- उत्कर्ष हा प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा आहे.
- सध्याचा मराठीतील आघाडीचा गायक आदर्श शिंदेचा उत्कर्ष मोठा भाऊ आहे.
- आजोबा आणि वडिलांनी निवडलेली वाट न निवडता उत्कर्षने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
- उत्कर्ष शिंदेने त्याचे डॉक्टरकीचे शिक्षण पुणे, मुंबई, लंडन आणि अमेरिकेत घेतले.
- उत्कर्ष एमडी असून त्याने पद्युत्तर शिक्षण लंडन येथे तर पीजीडीईएस अमेरिकेत केले.
- वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उत्कर्ष गायक, संगीतकार, गीतकार आणि अभिनेता देखील आहे.
- उत्कर्ष संगीत क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील सक्रीय आहे.
- ‘हाक मारतेय कोल्हापूर’, ‘गो करोना, करोना गो’, ‘से कोव्हिड योद्धा’, ‘हळदीचा सोहळा’ ही गाणी त्याने गायली आहेत.
- सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव गाठीशी असलेला उत्कर्ष बिग बॉसच्या घरात देखील सहभागी झाला होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या