Top Recommended Stories

Varun Dhawan Birthday Special: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते वरुण धवनला प्रपोज, पण...

Varun Dhawan Birthday Special : वरुण धवन हा चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रामाणिक आणि इमोशनल अभिनेता मानला जातो. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या वरुणचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी मुंबईत झाला. त्याने 2012 मध्ये करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज वरुण धवनचा भारतातच नाही तर जगभरात चाहता वर्ग आहे.

Published: April 24, 2022 9:39 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

varun dhawany
varun dhawany

Varun Dhawan Birthday Special : बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार वरुण धवनचा आज वाढदिवस (Varun Dhawan Birthday) आहे. वरुण आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. आपल्या जोरदार अभिनय आणि संघर्षाच्या जोरावर वरुण धवनने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जवळपास 10 वर्षांपूर्वीपर्यंत बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची ओळख केवळ चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनचा (Devid Dhawan) मुलगा अशीच होती. पण आता काळ बदलला आहे प्रत्येक बापाला आपला मुलगा म्हणून ओळखल्याचा अभिमान वाटतो. डेव्हिड धवनला आता हेच जाणवत असेल, कारण त्याचा मुलगा वरुण धवन हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 10 वर्षांच्या मेहनतीनंतर चित्रपटसृष्टीत अव्वल स्थानी वरुण धवन पोहोचला आहे. वरुण धवनच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी (Varun Dhawan Birthday Special) जाणून घेणार आहोत..

Also Read:

वरुण धवन हा चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रामाणिक आणि इमोशनल अभिनेता मानला जातो. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या वरुणचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी मुंबईत झाला. त्याने 2012 मध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज वरुण धवनचा भारतातच नाही तर जगभरात चाहता वर्ग आहे. अभिनेता होण्याआधी वरुण धवनने दिग्दर्शन क्षेत्रातील बारकावेही आत्मसात केले आहेत. 2010 मध्ये त्याने शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी अभिनय विश्वात पाऊल ठेवले.

You may like to read

वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन दिग्दर्शक असले तरी त्यांनी वरुणला त्याच्या होम प्रोडक्शनमधून कधीही लॉन्च केले नाही. वरुणने दुस-या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्याच्या क्षमतेनुसार भूमिका साकारायला हवी, असे त्यांचे मत होते. वरुणने यूकेच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. वरुण धवन खूप मेहनती आहे. तो आपल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतो हे आपण नेहमी पाहिले आहे. बदलापूर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, वरुण धवनने आपले कुटुंब गमावलेल्या दुःखी माणसाच्या व्यक्तिरेखेमध्ये येण्यासाठी स्वतःला पूर्णपणे वेगळे केले होते.

वरुण धवनच्या गोंडसपणाने लाखो मुलींना भुरळ घातली आहे पण एक काळ असा होता की बॉलीवूडची टॉप अभिनेत्री त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची. एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने सांगितले की, ती वरुण धवनवर खूप प्रेम करते. एकदा शूटिंगदरम्यान तिने वरुणला एक बहाणा करत टेकडीवर नेले आणि प्रपोज करण्याचे धाडस केले. मात्र, यासाठी श्रद्धा कपूरने गेम प्लॅन केला आणि वरुणच्या तोंडून ‘आय लव्ह यू’ म्हणायचे होते. पण वरुणचे थेट उत्तर ‘नाही’ असे होते. नंतर श्रद्धा कपूरने सांगितले की, ही लहानपणाची गोष्ट आहे, तेव्हा दोघेही फक्त 8 वर्षांचे होते. दरम्यान, 24 जानेवारी 2021 रोजी वरुणने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 24, 2022 9:39 AM IST