Top Recommended Stories

Lata Mangeshkar Dies: लता मंगेशकर यांना झाला होता जीवे मारण्याचा प्रयत्न, नेमका काय आहे तो किस्सा! जाणून घ्या...

Lata Mangeshkar Dies : लतादीदींच्या आयुष्याशीसंबंधित बरेच किस्से आहेत. पण त्यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली होती ज्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हादरले होते.

Updated: February 6, 2022 1:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

LATA MANGESHKAR DIES
LATA MANGESHKAR DIES

Lata Mangeshkar Dies : हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film Industry) ज्येष्ठ आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Veteran Singer Lata Mangeshkar) यांनी आपल्या दमदार आवाजाने दीर्घकाळ प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या सुंदर आवाजाने जगभरातील अनेक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. लता मंगेशकर यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांना (Bollywood Movie) आपला आवाज दिला आहे. त्यांनी गायलेली गाणीही सुपरहिट (Song Superhit) ठरली आहेत. लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passes Away) यांचे स्थान कोणीच मिळवू शकत नाही. लहानपणापासूनच संगीताला आपल्या जीवनात स्थान मिळवून देणाऱ्या लतादीदींनी आजपर्यंत 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. लतादीदींच्या आयुष्याशीसंबंधित बरेच किस्से आहेत. पण त्यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली होती ज्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हादरले होते. लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Lata Mangeshkar Given Slow Poison) झाला होता हा किस्सा नेमका काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत….

Also Read:

You may like to read

गानसमाज्ञी लता मंगेशकर यांच्या आयुष्याशी संबंधित हा एक जुना किस्सा आहे. लतादीदींना वयाच्या 33 व्या वर्षी विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. लतादीदींच्या जवळच्या मैत्रिणी पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहा से लाऊं’ या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. ही घटना 1963 ची आहे. जेव्हा लतादीदींना सतत उलट्या होत होत्या. डॉक्टरांनी तपासाअंती सांगितले होते की, त्यांना स्लो पॉयझन देण्यात आले होते. मात्र आता खुद्द लता मंगेशकर यांनी या कथेचा पडदा हटवला होता.

एका मुलाखतीत लतादीदी म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही मंगेशकर याविषयी बोलत नाही कारण तो आमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर टप्पा होता. ते 1963 साल होतं, मला एवढं अशक्त वाटू लागलं की मी पलंगावरून उठू शकत नव्हती.’ लता मंगेशकर यांनी त्यावेळी सांगितले होते की, ‘डॉ. कपूर यांच्या उपचाराने त्या हळूहळू बऱ्या झाल्या. मला स्लो पॉयझन देण्यात आले हे खरे आहे. पण डॉ. कपूर यांच्या उपचारामुळे आणि माझा विश्वास यामुळे मला पुन्हा उभे राहायला मिळाले. जवळपास तीन महिने अंथरुणावर पडल्यानंतर मी पुन्हा गाणी रेकॉर्ड करू शकले.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 6, 2022 1:31 PM IST

Updated Date: February 6, 2022 1:34 PM IST