Top Recommended Stories

Salman Khan नंतर आता Vicky Kaushal आणि Katrina Kaif ला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसात गुन्हा दाखल!

Vicky Katrina Gets Threats : याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. याआधी बॉलिवूडचा सुलतान अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी आली होती.

Updated: July 25, 2022 12:49 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

विकी कौशल आणि कतरिना कैफ
विकी कौशल आणि कतरिना कैफ

Vicky Katrina Gets Threats : बॉलिवूड (Bollywood) स्टार कपल विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी विकी कौशल आणि कतरीना कैफने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. याआधी बॉलिवूडचा सुलतान अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती सोशल मीडियावर (Social Media) कतरिनाला बराच वेळ स्टॉक करत होता. विक्की कौशलने त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला होता, तरीही तो तसाच करत राहिला आणि शेवटी विक्कीने हे पाऊल उचलले. या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी विकी आणि कतरिनाने थेट सांताक्रुझ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You may like to read

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘तुझा मूसवालाही करणार’, असे या पत्रात लिहिले होते. याप्रकरणाचा तपास देखील मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानला संरक्षण देण्यात आले होते.

दरम्यान, कतरिना कैफने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त कतरिना आणि विकी हे मालदीवला गेले होते. कतरिनाने आपला वाढदिवस जवळच्या मित्रपरिवारासोबत मालदीवला साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. विकी आणि कतरीनाने 9 डिसेंबर 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>