Top Recommended Stories

Vidyut Jammwalने -8 डिग्री तापमानात बर्फाने गोठलेल्या तलावात मारली उडी, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले 'तूच सुपरहिरो'

Vidyut Jammwal Video : विद्युतने नुकताच एक जबरदस्त व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे जो पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.

Published: February 26, 2022 9:15 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Vidyut Jammwal Video
Vidyut Jammwal Video

Vidyut Jammwal Video : ‘कंट्री बॉय’ म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विद्युत जामवाल (Actor Vidyut Jammwal) याने फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोमँटिक आणि चॉकलेट बॉयची (Romantic And Chocolate Boy) प्रतिमा सोडून या अभिनेत्याने अॅक्शन हिरो (Action Hiro) म्हणून प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. विद्युत जामवाल सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच सक्रिय असतो. विद्युत अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. ज्याला त्याच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. अशामध्ये विद्युतने नुकताच एक जबरदस्त व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे जो पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.

Also Read:

You may like to read

विद्युत जामवालने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन (Vidyut Jammwal Instagram Account) हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बर्फाच्छादित परिसरात उभा असलेला दिसत आहे. सर्वत्र बर्फाची दाट चादर पसरलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये सर्वात आधी विद्युत आपल्या अंगावर असलेले कपडे काढतो त्यानंतर तो हळूहळू बर्फाळ तलावात उतरतो. विद्युत जामवालचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. त्याच्या चाहत्यांनी देखील या व्हिडिओवर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विद्युत जामवाल सध्या काश्मीरमध्ये आहे.

विद्युत जामवाल व्हिडिओमध्ये म्हणतो की, ‘मी स्वत:ला विद्युत जामवालप्रमाणे ट्रेन केले आहे. यानंतर तो असेही सांगतो की, एक दिवसापूर्वी येथे बर्फवृष्टी झाली होती. परंतु आज मी येथे आला आहे. हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना विद्युत जामवालने लिहिले की, ‘जर कोणी तुम्हाला सांगितले तर ते कठीण आहे!. कल्पना NoExperience मधून येते..ते सोपे करा…करून टाका!! तुमचे स्वतःचे अडथळे तोडा.’ विद्युत जामवालच्या या व्हिडिओला नेटिझन्स खूप चांगली पसंती देत आहेत. त्याच्या या व्हिडिओला लाईक करत चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. ‘तू सुपरहिरो आहे’ अशा कमेंट्स त्यांनी केल्या आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 9:15 PM IST