Vikram Vedha First Look: हृतिक रोशनला मिळाले बर्थडे गिफ्ट, ‘विक्रम वेधा'चा फर्स्ट लूक रिलीज
बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशनच्या वाढदिवशी 'विक्रम वेधा' या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हृतिक पहिल्यांदाच सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Vikram Vedha First Look: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) वाढदिवशी ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हृतिक पहिल्यांदाच सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटात हृतिक (happy birthday Hrithik Roshan) एका गँगस्टरच्या भूमिकेत असून सैफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Also Read:
- 'Adipurush’साठी Prabhas आणि Saif Ali Khan ने वसुल केले इतके कोटी रुपये, जाणून घ्या इतर स्टारकास्टचे मानधन!
- Disappointing Adipurish: सोशल मीडियावर 'ब्रह्मास्त्र'नंतर आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या लूकवरून उठलं वादंग
- Alcoholia Song: विक्रम-वेधाचं अल्कोहोलिया गाणं रिलीज! हृतिक रोशन बनला आयटम बॉय, पाहा Video
हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत
‘विक्रम वेधा’च्या फर्स्ट लूकमध्ये हृतिक रोशन एकदम डॅशिंग दिसत आहे. रिलीज करण्यात आलेल्या या लूकमध्ये त्याने निळ्या रंगाचा कुर्ता घातला असून सनग्लासेस लावलेले दिसत आहे. हृतिकच्या डोक्यावर जखम दिसत असून त्यातून रक्त वाहताना दिसत आहे. शरीरावर रक्ताचे डागही आहेत. फर्स्ट लुक शेअर करताना हृतिकने लिहिले – ‘वेधा’. हृतिकचा हा लूक पाहून चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
View this post on Instagram
विक्रमची भूमिका साकारतोय सैफ अली खान
या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) विक्रमची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित हा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सैफचा फर्स्ट लुक अजून बाहेर आलेला नाही. पण त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. यात राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज हृतिकचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठं गिफ्ट आणखी कोणतं असू शकतं.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या