Top Recommended Stories

World Cancer Day 2022: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी हसत हसत जिंकली कॅन्सरची लढाई!

World Cancer Day 2022: वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त कॅन्सरविरोधातील लढाई जिंकणाऱ्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री कोण आहेत हे घ्या जाणून...

Published: February 4, 2022 9:50 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Manisha Koirala to tahira kashyap sonali bendra bollywood actress fight with cancer with smile details World Cancer Day 2022
Manisha Koirala to tahira kashyap sonali bendra bollywood actress fight with cancer

World Cancer Day 2022: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film industry) अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयानेच नव्हे तर हसत हसत कॅन्सरची लढाई जिंकून (Bollywood Actress Fight With Cancer) एक आदर्श निर्माण केला आहे. मनीषा कोईरालापासून (Manisha Koirala) किरण खेरपर्यंत (Kiran Kher) अनेक अभिनेत्री मृत्यूला झुगारून परतल्या आहेत. असे म्हटले जाते की, जिथे इच्छाशक्ती आहे तिथे तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा अनेक बॉलीवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी कॅन्सरसारख्या (Cancer) जीवघेण्या आजारावर मात केली आहे. या गंभीर आजाराशी लढताना त्यांना त्रास झाला पण त्यांचा आत्मविश्वास काही तुटला नाही. मागे न हाटता त्यांनी या आजाराची लढाई यशस्वीरित्या लढली आणि आज त्या सामान्य आयुष्य जगत आहेत. वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त कॅन्सरविरोधातील लढाई जिंकणाऱ्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री (Bollywood Actress) कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत….

Sonali Bendre Shares Strong Post on Cancer Survivors Day, Says 'I Didn't Let C Word Define My Life'

Sonali Bendre Shares Strong Post on Cancer Survivors Day, Says ‘I Didn’t Let C Word Define My Life’

You may like to read

सोनाली बेंद्रे (Sonali Bendra)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2019 मध्ये हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. सोनालीने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. ही बातमी ऐकल्यानंतर सोनालीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोनालीने उपारासाठी न्यूयॉर्कमध्ये गेली. बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर सोनालीने कॅन्सरवर मात केली.

Ayushmann Khurrana and Tahira Kashyap

Ayushmann Khurrana and Tahira Kashyap (Picture Courtesy: @Instagram/ayushmannk)

ताहिरा कश्यप खुराना (Tahira Kashyap Khurana)-

बॉलिवूडचा तरुण आणि स्टार अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यपनेही कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिला आहे. ताहिरानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आजाराची माहिती दिली होती. 2018 साली ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. पण या सुंदर लेखक आणि दिग्दर्शिकेने कॅन्सरविरोधातील ही लढाई धैर्याने जिंकली.

Manisha Koirala

Manisha Koirala

मनीषा कोईराला (Manisha Koirala) –

बी-टाऊनची दिग्गज अभिनेत्री मनीषा कोईराला देखील कॅन्सर झाला होता. वयाच्या 42 व्या वर्षी या अभिनेत्रीला गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा द्यावा लागला होता. 2012 मध्ये मनीषाला याची माहिती मिळाली. त्यानंतर तब्बल 6 महिने तिच्यावर अमेरिकेत उपचार झाले. 2013 मध्ये ती पूर्णपणे बरी झाली होती. ‘दिल से’ फेम अभिनेत्रीने कॅन्सरवर मात केल्यानंतर एक पुस्तकही लिहिले ज्यामध्ये तिने या काळातील परिस्थिती आणि संघर्ष याबद्दल लिहिले आहे. ‘Healed: How Cancer Gave Me A New Life’ असे या पुस्तकाचे नाव आहे.

kiran kher

kiran kher

किरण खेर (Kiran Kher) –

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर बऱ्याच दिवसांनंतर आपल्या कामावर परतली आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या 9व्या सीझनच्या त्या जज आहेत. कॅन्सरमुळे त्या बराच काळ कामापासून दूर होत्या. अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदिगडमधील खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला होता.

दरम्यान, कॅन्सर हा एक गंभीर आणि वेदनादायक आजार आहे. त्याचावर उपचार शक्य आहे. ही जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कॅन्सरशी लढा देण्यासाठी देशात आणि जगभरात अनेक पावलं उचलली जात आहेत ज्याच्या परिणामी काही लोकांना त्यांचे जीवन परत मिळत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.