मुंबई: ‘झी मराठी’वर (Zee Marathi) सुरू झालेली मालिका ‘तुझी माझी रेशीमगाठ’नं (Tuzi Mazi Reshimgath) अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मुख्य भूमिकेत आहेत. दोघांच्या केमस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. प्रार्थनानं तब्बल 10 वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुरागमन केलं आहे. याआधी ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushantsingh Rajput) याच्यासोबत ती ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेत दिसली होती. प्रार्थनानं आतापर्यंत मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे.Also Read - Shivsena Dussehra Melava 2021: आधी म्हणत होते मी पुन्हा येईन, आता म्हणतात मी गेलोच नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

आपलं निखळ सौंदर्य आणि मनमोहक हास्यानं लाखो रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रार्थना (Prarthana Behere) ही ‘तुझी माझी रेशीमगाठ’ यां मालिकेत नेहा कामतची भूमिका साकारते आहे. प्रार्थना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. विशेष म्हणजे प्रार्थनानं इंस्टाग्रामवर नुकताचं तिच्या रिअल नवरा अभिषेक जावकर (abhishek jawkar) याच्यासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. Also Read - PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा रद्द होईल घर!

प्रार्थना आणि अभिषेक या व्हिडीओमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. चाहत्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षश: पाऊस पडला आहे.
Also Read - Nora Fatehi ला संबोधलं जातं भारताची Kim Kardashian; तिची फिगर उडवते चांगल्या चांगल्यांची झोप!

अशी जुळली प्रार्थना आणि अभिषेकची रेशीमगाठ!

प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं, हे दोघांनाही समजलं नाही. लग्नानंतर दोघांची रेशीमगाठ अधिक घट्ट झाली.

कोण आहे अभिषेक जावकर?

अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्यानं अनेक चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. ‘डब्बा एैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.