मुंबई: आपल्या अभिनयानं हजारो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जोहरा सेहगल (Bollywood Actress Zohra Sehgal) यांचा आज वाढदिवस. (27 एप्रिल 1912 – 10 जुलै 2014) सहारनपूर येथे जन्मलेल्या जोहरा मुमताज सेहगल ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर होत्या. जोहरा यांनी उदय शंकरच्या संचात नृत्यांगना म्हणून करिअरची सुरूवात केली होती. (Zohra Sehgal Birth Anniversary) देशातच नव्हे तर अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्ये विविध कार्यक्रम केले. करिअरच्या 60 वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या. (Bollywood News in Marathi)Also Read - Rubina Dilaik Photo: TV वरील संस्कारी बहू झाली टॉपलेस, लाल गुलाब परिधान करून केले बोल्ड फोटोशूट

जोहरा या रामपूरच्या नवाबी कुटुंबातील होत्या. मात्र, त्यांनी कर्तुत्त्वाच्या जोरावर संपूर्ण जगात आपली वेगळी निर्माण केली होती. वाढदिवशी जाणून घेऊया दिग्गज अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्याबद्दल रोचक आणि कधी न ऐकलेले किस्से… (Zohra Sehgal Unknown Facts)
Also Read - ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये Mouni Roy चे बोल्ड फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमँटिक पोझ!

कपूर कुटुंबातील चार पिढ्यांसोबत केलं काम….

-जोहरा मुमताज सेहगल ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि उत्तम कोरिओग्राफर होत्या. Also Read - Cruise Drugs Case : क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा, एनसीबीने दिली क्लिनचीट!

– जोहरा यांनी सन 1935 मध्ये एक नृत्यांगना म्हणून करिअरला सुरूवात केली. जोहरा यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

-संजय लीला भंसाली यांचा चित्रपट ‘सांवरिया’मध्ये (2007) त्या दिसल्या होत्या. त्यांना 2010 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

– ‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल से’ आणि ‘चीनी कम’ सारख्या सुपरहिट चित्रपटात जोहरा यांनी दमदार अभिनय केला.

-जोहरा यांनी सन 1946 मध्ये ‘धरती के लाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

-सन 2012 मध्ये मुलगी किरण हिनं ‘जोहरा सहगलः फॅटी’ या नावानं आईचं आत्मचरित्र लिहिलं.

-जोहरा यांनी वयानं 8 वर्षे लहान हिंदू तरुणाशी लग्न केलं होतं. कामेश्वर नाथ सेहगल असं त्यांच्या पतीचं नाव होतं. त्यांच्या या निर्णयानं सगळे नाराज झाले होते.

-जोहरा या क्रिकेटच्या चाहत्या होत्या.

– जोहरा सेहगल या एक वर्षाच्या असताना Glaucoma नामक आजारानं त्यांनी एक डोळा गमावला होता.

-जोहरा यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांसोबत काम केलं होतं.

-10 जुलै 2014 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा त्या 102 वर्षांच्या होत्या.