श्वास हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत, अशा या इतक्या महत्त्वाच्या श्वासाकडे आपण एरवी किती दुर्लक्ष करतो. आपल्या जन्माच्या क्षणापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत हा श्वास आपली सोबत करत असतो. मात्र, सध्याचे धकाधकीच्या आयुष्य असे काही आपल्या मनामध्ये भिनलेले असते की आपण दिवसामधला थोडावेळदेखील या श्वासाला देऊ शकत नाही.

आपण एका मिनिटात किमान 18 वेळा श्वास घेतो, तासाभरामध्ये 1080 वेळा श्वास घेतो आणि वर्षभरामध्ये आपण तब्बल 8,409,600 इतक्यावेळा श्वास घेतो. आपण श्वास घेताना केवळ शुद्ध ऑक्सिजनच फुप्फुसामध्ये घेत नाही तर हवेमध्ये असलेले सर्व काही आपण आपल्या शरीरामध्ये ओढून घेतो, आपली फुप्फुसे त्यामधली केवळ ऑक्सिजन घेतात, मात्र कित्येक धोकादायक जीवाणू, प्रदूषके, केमिकल्स आणि घातक द्रव्ये हवेमधून आपल्या शरीरामध्ये येतातच, त्यामुळे आपली श्वसनयंत्रणा वारंवार अनेक आजारांना बळी पडत राहते. अशावेळी आपल्या श्वासाकडे एका नवीन दृष्टीने पाहून त्यावर अधिक विचार करणे आवश्यक आहे.

सॉल्ट केव्ह आशिया, ही नवीन सुरू झालेली भारतामधली ब्रीदींग सेंटर आणि हॅलो थेरपीची अग्रगण्य संस्था आहे. हालोथेरपी ही अल्टरनेट मेडीसीनची एक शाखा असून यामध्ये मिठाचा वापर औषधी स्वरूपामध्ये केला जातो. सॉल्ट केव्हमध्ये अत्याधुनिक यंत्रणा, सक्षम वैद्यकीय तज्ञ आणि सुसज्ज मेडिकल संसाधनांचा वापर केलेला असून ही थेरपी सेंटर जागतिक दर्जाची बनवलेली आहेत. अतिशय उच्चतम तंत्रज्ञानाने बनवलेल्या या ट्रीटमेंट रूममध्ये एका नैसर्गिक मिठांच्या गुहेमध्ये असलेले वातावरण आर्टीफिशीअली पुन्हा बनवलेले आहे. त्यासाठी नैसर्गिक मीठ हे हवेमध्ये मिसळेलेले असून त्याचा उपयोग थेरपीच्या पहिल्या तासामध्ये नैसर्गिक जंतुनाशक म्हणून केला जातो.   या थेरपी सेशनमध्ये केवळ नैसर्गिक मिठाच्या क्रीस्टल्स बसवलेल्या खोलीमध्ये केवळ बसून राहणे आणि श्वास घेत राहणे एवढेच करायचे आहे. अतिशय काळ्जीपूर्वक आखलेल्या शेड्युलनुसार या खोलीमध्ये हालोजनरेटर या उपकरणामधून कोरडे मीठ हे हवेद्वारे सोडण्यात येते.

salt cave 2

शास्त्रीय, नैसर्गिक आणि शंभर टक्के उत्तम प्रतिसाद देणारी ही उपचार पद्धती आहे. यामध्ये कुठलीही ड्रग्ज वापरली जातात नाहीत, तसेच ही नॉन इन्वेजिव म्हणजेच शस्त्रक्रियेविणा काम करणारी उपचार पद्धत आहे. सॉल्ट थेरपीमुळे अनेक् रोगांवर उपचार करता येतात. श्वसनसंस्थेचे रोग, कान-नाक-घसा यांचे रोग, त्वचेचे रोग, दमा, वारंवार होणारा कफ, विविध ऍलर्जी, आणि कमी होणारी इम्युनिटी अशा अनेक त्रासांवर सॉल्ट थेरपी उत्तमरीत्या काम करू शकते. त्वचेच्या सोरायसिस, एक्झेमा, डेर्मिटायसिस, मल्टीकेमिकल सेन्सिटीव्हिटी सिन्ड्रोम आणि एक्ने या आजारांवर सॉल्ट थेरपीमुळे लक्षणीयरीत्या फरक पडतो. तसेच, सॉल्ट थेरपी इम्युनिटीच्या प्रभावी वाढीसाठी फायद्याची ठरू शकते, सध्याच्या शहरी प्रदूषित वातावरणामध्ये जगत असताना प्रत्येकालाच स्वच्छ प्रदूषणविरहित आणि नैसर्गिक हवेची गरज आहे. सॉल्ट थेरपी स्मोकर लोकांसाठी विशेष वरदान ठरू शकते, तसेच, या थेरपीमुळे त्वचा अधिक नितळ आणि रिफ्रेश दिसू लागते. खेळाडू लोकांना त्यांचा स्टॅमिना आणि कामगिरी उंचावण्यासाठी सॉल्ट थेरपी उपयुक्त ठरू शकते.

salt cave 3

सॉल्ट थेरपी नक्की कशाप्रकारे काम करते ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पेशंट सेंटरमधील सक्षम व्यावसायिक आणि ऑन बोर्ड डॉक्टर्स यांच्यासोबत त्यांच्या आरोग्यसमस्यांबद्दल प्रदीर्घ डिस्कशन करतात. यानंतर त्यांना सुयोग्य असा सॉल्ट थेरपी प्लान सुचवला जातो. पेशंटना जंतुविरहित, कंट्रोल्ड अशा ट्रीटमेंट रूममध्ये नेण्यात येते. या खोलींच्या जमीनीवर, छतावर चारी भिंतींवर तसेच इतर प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक मिठाचे क्रिस्टल बसवलेले आहेत. यामुळे ही खोली जणू नैसर्गिक मिठाच्या गुहेसारखीच आहे. इथले मायक्रोक्लायमेट अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक असून त्यामुळे आरोग्य समस्यांचे निवारण होण्यामध्ये मदत होते. तासाच्या थेरपीसेशनमध्ये हालोजनरेटर या उपकरणाद्वा्रे नैसर्गिक मिठाचे अगदी सूक्ष्म कण हवेमध्ये मिसळले जातात, जे श्वासाद्वारे पेशंटच्या शरीरामध्ये जातात. पेशंटना या खोलीमध्ये केवळ निवांत बसून ही कोरडी, मिठयुक्त हवा श्वसनाद्वारे घ्यायची आहे. पेशंट या हवेमध्ये श्वसन घेत असतानाच एखादी जादूची कांडी फिरावी तशा पद्धताने हिलिंग प्रोसेस चालू होते आणि पहिल्याच सेशनपासून फरक दृष्टीस पडू लागतो. ही सॉल्ट थेरपी उपचार पद्धती शंभर टक्के सुरक्षित आहे, आणि लहान मुलांसाठीदेखील तितकीच परिणामकारक आहे. लहान मुलांमध्ये वारंवार होणार्‍या शसन यंत्रणेच्या समस्यांसाठी सॉल्ट थेरपी ही अत्यंत उपयुक्त पद्धत आहे कारण यामध्ये जंतुनाशक, जळजळ न होणारी आणि कफ काढून टाकणारे उपचार केले जातात. लहान मुलांसाठी ट्रीटमेंट रूममध्ये खेळणी ठेवलेली असून ज्यावेळी मुले इथे ट्रीटमेंट घेत असतात तेव्हा प्रौढ व्यक्ती त्यांच्यावर लक्ष ठेवून स्वत:देखील ट्रीटमेंट घेऊ शकतात.

एकंदर सर्व निरामय आरोग्याचा विचार, शरीरस्वास्थ्याकडे सुनियोजित लक्ष, नैसर्गिक आणि परिणामकारक अशी ही सॉल्ट थेरपी आपल्या आयुष्यामधल्या श्वासांना अधिकाधिक सक्षम बनवते.