एक काळ होता स्लिपर वापरणे म्हणजे अगदीच खालच्या दर्जाचे समजले जात असे. पण, अलिकडीला काळात जर पाहिले तर सर्वाधिक कम्फर्टेबल चप्पल म्हणून अधिक काय वापरले जात असेल? तर, ती म्हणजे स्लिपर. कम्फर्टेबल आणि फॅशन दोन्हीसाठी स्लिपर प्रसिद्ध आहे. मार्केटमध्येही आपल्याला अनेक प्रकारच्या स्लिपर्स पहायला मिळतात. अगदी रंगीबेरंगी, प्रिंडेड, कोट लिहीलेल्या. पण, आपल्याला कल्पना आहे का, चप्पल वापरणे हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील The Wake Forest Baptist Medical Center च्या डॉक्टर क्रिस्टीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत स्लिपर्स वापरल्याने आपल्या पायांच्या नसांवर सतत ताण पडतो. त्यामुळे पायांना प्रचंड त्रास होऊ शकतो. तसेच, आपल्या पाठीत वेदणाही होऊ शकतात. क्रिस्टीनांनी म्हले आहे की, हा प्रकार वाढत राहिल्यास व त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोकांना अनेकदा प्लांटर फॅसाईटिस नावाचा आजार होतो. अनेकांना तो झाला आहे. हा आजार झाल्यास पायाचे तळवे आणि बोटे यांना जोडणाऱ्या भागात सूज येते तसेच, पाय दुखण्यास सुरूवात होते.

डॉक्टरांनी पूढे म्हले आहे की, स्लिपर्स वापरल्यामुळे पायाच्या पंजांना कोणताही आधार मिळत नाही. चप्पल घातल्यावर पायाच्या पूढच्या भागाला सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. क्रिस्टीना यांनी म्हटले आहे की, सतत चप्पल वापरणे आणि चुकीच्या पद्धतीने चप्पल वापरल्याने अशा प्रकारचा त्रास वाढतो. नसांवर अतिरिक्त भार पडल्यामुळे गंभीर आजारालाही तोंड द्यावे लागते. हा त्रास गंभीर झाल्यास विकलांगताही येऊ शकते.