धक्का बसला ना … पण हे खरंच आहे स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हँक ग्रीली यांच्या मते पुढील 30 वर्षात मुलं जन्माला घालण्यासाठी लोकांना सेक्सची अजिबातच गरज नाही. हँक, स्टॅन्फर्ड लॉ स्कूल चे सेंटर फॉर लॉ एंड द बायोसाइंसेजचे डायरेक्टर आहेत. हँक यांच्या मते गेल्या 3 दशकात प्रजनन प्रक्रिया बदलणार आहेत आणि पालकांजवळ ऑप्शन्स असणार आहे की आपल्या डीएनए मार्फत लॅबमध्ये वेगवेगळे भ्रूण तयार केले जाणार आहेत. आणि जे पसंद पडेल ते भ्रूण ते निवडू शकतात.

आता अशा प्रकारची सुरूवात झाली आहे मात्र हँक यांच्या मते आगामी येणाऱ्या काळात ही प्रक्रिया सक्तीची केली जाणार आहे. आणि कपल्स देखील कोणत्याही आजारापासूव वाचण्यासाठी या प्रक्रियेचा स्विकार करतील. या प्रोसेसमध्ये फिमेल स्किनचा सँपल घेऊन सर्वात प्रथम स्टेम सेल बनवलं जातं. आणि मग त्याचा वापर अंड बनवण्यात केलं जातं. यानंतर या अंड्यात स्पर्म सेल्सला फर्टिलाइज करून भ्रूण तयार केलं जातं.

भ्रूणचा शोध घेताना कोणत्याही इतर आजारा बाबत काळजी घ्यायची आहे. स्टॅन्फर्डच्या प्रोफेसर यांच्या मते प्रक्रिये दरम्यान पालकांजवळ इतर कोणतंही ऑप्शन दिलेलं नाही. एवढंच काय यापुढे पालक आपल्या मुलाच्या डोळ्यांचा आणि केसांचा रंग देखील निवडू शकतो. त्यामुळे हे निर्माण होणार बाळं निसर्गाच्या पसंतीने नाही तर आपल्या पसंतीने असणार आहे.

प्रोफेसर हँक सांगतात की, या प्रक्रियेतील सर्वात कठीण गोष्ट ही आहे की, या कारणामुळे सर्वाधिक जास्त घटस्फोट होऊ शकतात. कारण जर पत्नीला भ्रूण क्रमांक 15 हवा असेल आणि पतीला भ्रूण क्रमांक 64 हवा असेल तर त्यांच्यात वाद होण्याची दाट शक्यता आहे.