Top Recommended Stories

Accident in Sikkim: सिक्किममध्ये भीषण अपघात, लष्कराच्या 16 जवानांचा मृत्यू

Accident in Sikkim: उत्तर सिक्किममध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण अपघात होऊन लष्कराच्या 16 जवानांचा मृत्यू झाला.

Published: December 23, 2022 5:52 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

BREAKING: 16 Indian Army Jawans Dead in Sikkim Road Accident
BREAKING: 16 Indian Army Jawans Dead in Sikkim Road Accident

Tragic Road accident in Sikkim: सिक्किममधून (North Sikkim) एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर सिक्किममध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला. त्यात लष्कराचे 16 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराचा एक ताफा चेटन येथून थांगू येथे जात असताना उत्तर सिक्किममधील जेमा (Zema) येथे हा भीषण अपघात झाला. लष्कराचा एक ट्रक थेट खोल दरीत कोसळला. ट्रकमध्ये जवान बसले होते. त्यापैकी 16 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. या अपघातत चार जवान गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच लष्कराकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. चार गंभीर जवानांना एअर अँम्बुलन्सने उत्तर बंगालमधील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. भारतीय लष्कराच्या ट्रकमध्ये 20 जवान होती. ही ट्रक सीमेवरच्या चौकीच्या ठिकाणी जात होती. जेमा येथे पोहोचताच एक वळणावर वाहनचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट खोल दरीत कोसळला. मृतांमध्ये तीन ज्यूनिअर कमिशन ऑफिसर (JSO) आणि 13 जवानांचा समावेश आहे.

You may like to read


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत अत्यंत दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्र्यांनी ट्वीट करून मृत जवानांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. ‘देशाच्या जवानांची सेवा आणि वचनबद्धतेबद्दल देश सदैव ऋणी राहील. जवानांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. अपघातात जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

भारत-चीनच्या सीमेवर झाला होता असाच भीषण अपघात…

दरम्यान, सन 2021 मध्ये देखील असाच भीषण अपघात झाला होता. त्यात भारतीय लष्कराच्या 7 जवानांचा मृत्यू झाला होता. तर भारत-चीन सीमेवर असलेल्या नाथुला दर्रेजवळ (Nathula Pass) जवाहर लाल नेहरू महामार्गावर 30 जून 2021 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार जवानांचा मृत्यू झाला होता. नंतर दुसऱ्याच दिवशी झाल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला होता.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.