
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
5G Smartphone: तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि Redmi किंवा Realme ब्रँडचे चाहते असाल तर तुमची आनंदाची बातमी आहे. Realme आणि Redmi दोन्ही ब्रँड आपले स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. रेडमी आपला Redmi 11 5G लाँच करण्यासाठी सज्ज आहे तर दुसरीकडे रिअलमीने देखील Realme GT Neo 3T लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे.
रेडमीचा हा स्मार्टफोन बजेट फोन असून हा स्मार्टफोन जून महिन्यात लॉन्च होऊ शकतो. Redmi 10 च्या सक्सेसच्या स्वरूपात हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन 5G कनेक्टिव्हिटी फीचरसह येणार आहे. यात Media Tek Dimensity 700 प्रोसेसर दिला जाणार आहे. यासह 5000 mAh ची बॅटरी आणि 18W च्या फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. या फोनची किंमत 13 ते 14 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
कॅमेरा आणि डिस्प्ले विषयी बोलायचे झाल्यास Redmi 11 5G मध्ये देखील MIUI पाहायला मिळेल. यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58 इंचचा Full HD+LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच यात ड्युअल रिअर कॅमेरा इन्स्टॉल करून मिळू शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा लेन्स 50 मेगा पिक्सल असेल. तर दुसरा लेन्स 2 मेगा पिक्सलचा दिला जाऊ शकतो. फ्रंट कॅमेऱ्याविषयी बोलायचे झाल्यास यात 5 मेगा पिक्सलचा कॅमेरा असेल.
Realme GT Neo 3T विषयी बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन निओ 3 सीरिजचा दुसरा डिव्हाईस असेल. या आधी कंपनीने Realme GT Neo 3 बाजारात आणला आहे. या फोनबाबत कंपनीने ट्विटरवर माहिती देत फोनचा टीझर फोटो जारी केला आहे. रिअलमीने सांगितले की तिसऱ्या जनरेशनाच्या GT Neo सीरिज अंतर्गत तीन स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहे. यातील एक मॉडेल म्हणजे Realme GT Neo 3T आहे. तर उर्वरित दोन 80W चार्जिंग आणि 150W चार्जिंगसह GT Neo असतील.
Realme GT Neo 3T या स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.62 इंचचा E4 AMOLED डिस्प्ले दिले जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट द्वारा पावर्ड असेल. हा स्मार्टफोन 8GB\12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज पर्यायसह हा उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह मिळेल. कॅमेऱ्याविषयी बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 118 डिग्री FOV सोबत 8MP अल्ट्रा व्हाईड लेन्स आणि 4cm फोकल लेन्थ सोबत 2MP मायक्रो कॅमेरा असेल. तसेच यात फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा असेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या