भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) शुक्रवारी सकाळी भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात बस आणि कंटेनरचा भीषण अपघात (bus and container truck Accident) झाला. या अपघातामध्ये 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 13 प्रवासी जखमी झाले आहेत. भिंड येथील राष्ट्रीय महामार्गावर (Bhind National Highway) ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Madhya Pradesh Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.Also Read - Crime News: हिमाचल प्रदेशमध्ये बेपत्ता झालेल्या 17 ट्रेकर्संपैकी 11 जणांचे मृतदेह सापडले

Also Read - Pune Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 12 जण जखमी

भिंड येथील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. गोहद चौक पोलिस स्टेशन हद्दीतील डॉग बिरखडी येथे ही घटना घडली. हा अपघात ऐवढा भीषण होता की सात जण जागीच ठार झाले तर 13 जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाला त्यावेळी प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पोलिसांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल केले. Also Read - BIG NEWS: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 6 गाड्या एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

भिंडचे एसपी मनोज सिंग (Bhind SP, Manoj Singh) यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, या अपघातामध्ये एकूण 13 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण जखमींमधील चार जणांची प्रकृती गंभीर (four are critical) आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी ग्वालियरला (Gwalior) हलवण्यात आले आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.