श्रीनगर : देशभरामध्ये 75 वा स्वातंत्र दिवस (75th Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) त्रालमध्ये (Tral) दहशतवादी बुरहान वानीच्या वडिलांनी ध्वजारोहण केले. व्यवसायाने शिक्षक असलेल्या बुरहान वानीचे वडील मुजफ्फर वाणीने पुलवामाच्या त्रालमध्ये स्थित असलेल्या शाळेमध्ये ध्वजारोहण करत राष्ट्रगीत गायले. मुजफ्फर वानी (Muzaffar Ahmad Wani) यांचा मुलगा बुरहान हा एकेकाळी दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय होता. बुरहान वानी हा हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर (Hizbul Commander Burhan Wani) होता. 8 जुलै 2016 मध्ये बुरहान वानी चकमकीत मारला गेला.Also Read - Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख; आत्ताच करा अर्ज

Also Read - High Alert: 15 ऑगस्टला लष्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मदकडून मोठ्या हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

बुरहान वानी जम्मू-काश्मीरच्या त्रासचा निवासी होता. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. 2010 मध्ये म्हणजे अवघ्या 15 व्या वर्षी बुरहान वानी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. असे सांगितले जात आहे की, सैन्यांनी त्याच्या भावासोबत चूकीचा व्यवहार केला होता त्यामुळे तो दहशतवादी बनला. बुरहान वानी तेव्हा चर्चेत आला जेव्हा त्याने लष्कराच्या गणवेशामध्ये हातमध्ये शस्त्र घेऊन फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले होते. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे होते की, बुरहान दक्षिण काश्मीरच्या 11 ते 15 दहशतवादी गटांचे नेतृत्व करत होता. Also Read - Galwan Valley Video: गलवानमधील भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणखी एक व्हिडिओ समोर; असा दिला चीनी सैन्याशी लढा

जम्मू-काश्मीरचे पोलिस अधिकारी अब्दुल जब्बारने (Police Officer Abdul jabbar) बुरहान वानीला ठार केले होते. बुरहानच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील पुलवामा, कुलगाम, शोपिंया आणि अनंतनाग या चार जिल्ह्यांमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. याठिकाणची परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. या हिंसेमध्ये पाच दिवसांत दोन पोलिसांसह 92 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 12000 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर त्याचे वडील आणि संपूर्ण कुटुंब लष्कराविरोधात आंदोलन (Protest against army) करत होते. पण पाच वर्षांनंतर बुरहानच्या वडिलांनी त्रालमध्ये ध्वजारोहण करत राष्ट्रगीत गायले.