भारत 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहन करून देशवासियांना संबोधित केले. पाहुयात त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…Also Read - Breaking News Live Updates: केंद्र सरकारचा बँकिंग क्षेत्रासाठी मोठा निर्णय, 30,600 कोटींच्या तरतुदीची केली घोषणा

Also Read - Gujarat New CM Bhupendra Patel: जनमाणसात ‘दादा’ नावानं प्रचलित, कोण आहेत गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री
Also Read - 'Into The Wild with Bear Grylls' या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार अजय देवगण!

Live Updates

 • 8:57 AM IST

  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा
  ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात भारताने काम करण्याची गरज : पंतप्रधान मोदी

 • 8:55 AM IST

  ऊर्जेच्याबाबतीततही आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज
  स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होण्याआधी हा संकल्प पूर्ण करायचा आहे.

 • 8:54 AM IST

  आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे.
  मिझोरममध्ये प्रयोग केला होता. पण आता देशातील सर्व सैनिक शाळांत मुलींना प्रवेश मिळणार
  केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आता मुलीही तिथे शिक्षण घेणार

 • 8:49 AM IST

  आज अनेक नवे स्टार्टअप येत आहेत. सरकार या स्टार्टअपसोबत उभी आहे.
  स्टार्टअप आर्थिक मदत, करात सूट अशा सुविधा दिल्या जात आहेत
  कोरोनाच्या काळात हजारो नवे स्टार्टअप उभे राहिले. यशस्वीपपणे वाटचाल सुरु आहे.

 • 8:45 AM IST

  भारताला उत्पादन आणि निर्यात वाढवावी लागणार आहे
  भारत आज लढाऊ विमानाची निर्मिती करत आहे.
  आज आपण तीन बिलियन डॉलर्सचे फोन निर्यात करत आहोत.
  भारताने स्वदेशची निर्मिती करताना जागतिक बाजाराला टार्गेट करायचं आहे.

 • 8:42 AM IST

  75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नरेंद्र मोदींनी ‘वंदे ट्रेन’ ची केली घोषणा
  ‘वंदे ट्रेन’ च्या माध्यमातून देशातील 75 ठिकाणांना जोडणार

 • 8:32 AM IST

  80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन ही चिंतेची बाब
  कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणणार
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र्यदिनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

 • 8:31 AM IST

  सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त बळ देण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे
  सहकारवादाचं सशक्तीकरण व्हावं म्हणून विशेष मंत्रालयाची स्थापना केली आहे
  सहकारवाद ही आपली प्रेरणा आहे, सहकारवाद आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक आहे.

 • 8:15 AM IST

 • 8:14 AM IST