नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांना फेस्टिव्ह सीझनमध्ये आणखी एक खूशखबर मिळू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance DA) गेल्या महिन्यात वाढ करण्यात आली होती. महागाई भत्ता (DA) 17 टक्क्यांवरून थेट 28 टक्के झाला आहे. सोबतच HRA देखील 24 टक्क्यांवरून वाढून 27 टक्के करण्यात आला आहे. मात्र, सणासुदीच्या दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना (7th Pay Commission) आणखी गुड न्यूज मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.Also Read - 7th Pay Commission: कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांवर सरकार मेहरबान, आता बँक कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी!

महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून आणखी एक गिफ्ट मिळू शकतं. जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात वाढ होण अपेक्षीत आहे. महागाई भत्त्यात आणकी 3 टक्क्यांनं वाढ होण्याची शक्यता आहे. AICPI च्या जून 2021 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 31 टक्के होईल. याचा अर्थ असा की, महागाई भत्त्यात आणखी 3 टक्के वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. Also Read - 7th Pay Commission: केंद्रानंतर आता 'या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला महागाई भत्ता

कर्मचारी संघटनेनुसार, सरकारनं लवकरात लवकर महागाई भत्त्यात (3% DA hike) वाढ करण्याची घोषणा करणं अपेक्षीत आहे. AICPI इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जून 2021 च्या इंडेक्‍समध्ये 1.1 अंकांनी वाढ झाली आहे. जूनमध्ये इंडेक्स 121.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जून 2021 मध्य महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणं निश्चित असल्याचं बोललं जात आहे. Also Read - 7th Pay Commission: मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांचे BASIC PAY वाढवण्यावर सरकारने दिले हे उत्तर

सप्टेंबर महिन्यांत निर्णय होण्याची शक्यता

कर्मचारी संघटनेकडून होणारी मागणी लक्षात घेता, जुलै 2021 साठी महागाई भत्त्यात (Dearness Allowance news) वाढ करण्याबाबत घोषणा याच महिन्यात होऊ शकते. मात्र, सरकार याचं वितरण ऑक्टोबरच्या वेतनात करू शकते. मात्र, सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा झाल्यात सरकारला जुलैपासून आतापर्यंत एरियर द्यावा लागेल. कारण आधीच दीड वर्षांच्या थकीत एरियरबाबत सरकार काहीच बोतल नाही आहे.