Top Recommended Stories

7th Pay Commission : गुड न्यूज! महागाई भत्त्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 4 भत्ते वाढणार

7th Pay Commission : डीए (DA) वाढल्याने प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये (Gratuity) आपोआप वाढ होईल. केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटी देखील वाढण्याची शक्यता आहे.

Published: April 25, 2022 11:47 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Annual Appraisal Survey 2021-22: Were Your Expectations Met? Know The Trend
Annual Appraisal Survey 2021-22: Were Your Expectations Met? Know The Trend

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Employees) आनंदाची बातमी (Good News) आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ करण्यात आल्यामुळे ते आनंदी होते. त्यांच्या आनंदाच आता आणखी भर पडणार आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 3 टक्के वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employee) पगारामध्ये देखील मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या इतर भत्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

डीए वाढल्याने प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये (Gratuity) आपोआप वाढ होईल. केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटी देखील वाढण्याची शक्यता आहे. ऐवढंच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि प्रवास भत्ता (टीए) ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

You may like to read

३० मार्च रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे अवघ्या 9 महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दुपटीने वाढला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 34 टक्के दराने डीए आणि डीआर मिळणार आहे. डीएमध्ये वाढ झाल्याचा फायदा देशभरातील 50 लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.