7th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक खूशखबर! जानेवारीच्या सॅलेरीत होईल 4500 रुपयांनी वाढ

26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Published: January 6, 2022 2:03 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

7th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक खूशखबर! जानेवारीच्या सॅलेरीत होईल 4500 रुपयांनी वाढ

7th Pay Commission Latest Update: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) आणखी एक खूशखबर (Good News) आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 (january 2022) महिन्याच्या वेतनात (Salary) 4500 रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत येत्या 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी (26 january Republic Day) घोषणा होण्याची शक्यता आहे.

Also Read:

Zee Business च्या एका रिपोर्टनुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या वेतनात 4500 रुपये वाढीव मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना व्हाऊचर भरावे लागणार आहे.

जाणून घ्या केंद्रीय कर्मचारी कसा करू सकतात 4500 रुपयांचा दावा?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुलांचा शैक्षणिक भत्ता (Children Education Allowance) मिळतो. COVID-19 साथीच्या आजारामुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये कर्मचाऱ्यांचे काही भत्ते थांबवले होते. आता अर्थमंत्रालयाने मुलांचा शैक्षणिक भत्ता देण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना यासाठी कोणत्याही अधिकृत दस्तऐवजाची आवश्यकता नाही.

दरम्यान, 7 व्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2250 रुपये मुलांचा शैक्षणिक भत्ता दिला जातो. कोरोना साथीच्या काळात देशातील शाळा बंद होत्या. त्यामुळे अर्थमंत्रालयाने सर्व कर्मचाऱ्यांना मुलांचा शैक्षणिक भत्ता देण्यात परवानगी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना शैक्षणिक भत्ता 4500 रुपये जानेवारी महिन्याच्या पगार मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो दोन मुलांसाठी शैक्षणिक भत्ता…

सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मुलांसाठी शैक्षणिक भत्ता दिला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याला दोन मुले असतील तर त्याच्या खात्यावर जानेवारीच्या वेतना व्यतिरिक्त 4500 रुपये जमा होतील.

दुसरीकडे, जानेवारी 2022 महिना सुरु झाला आहे. केंद्र सरकारचे लाखो कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची (Dearness Allowance) थकबाकी मिळण्याची आशा आहे. गेल्या 18 महिन्यांहून अधिक काळापासून हा भत्ता रखडला आहे. डीए (DA) वाढल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढेल. मात्र, जानेवारी 2022 मध्ये डीए वाढ किती टक्के लागू होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये DA मध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे. महागाई भत्ता वाढीशिवाय केंद्र सरकारच्या काही कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 2:03 PM IST